एक्स्प्लोर

Sandeep Kshirsagar : बीड जिल्हा धनंजय मुंडेंचा नाही तर शरद पवारांचा, सभेला लोकांची ढगफुटी होईल : संदीप क्षीरसागर 

बीड जिल्हा हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा नाही तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा जिल्हा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केलं.

Beed News : बीड जिल्हा हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा नाही तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा जिल्हा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केलं. बीड जिल्हा हा धनंजय मुंडे यांचा जिल्हा असल्यामुळं शरद पवार यांची इथे सभा होत आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी क्षीरसागर यांनी केला. यावर बोलताना बीड जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा असल्याचे क्षीरसागर म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर  शरद पवार यांची पहिली स्वाभिमान सभा ही आज बीडमध्ये होणार आहे. या सभेची जबाबदारी बीडचे आमदार आणि नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेल्या संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे. या स्वाभिमान सभेच्या तयारीसाठी आठवडाभर झालं संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हाभर फिरुन या सभेची पूर्वतयारी केली आहे. पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये कशामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे म्हणून का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी संदीप क्षीरसागर यांना केला होता. त्यावेळी बीड जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा असल्याचे सांगितले. जनता पवारसाहेबांसोबत खंबीरपणे उभा असल्याचे क्षीरसागर म्हणाले. 

शरद पवारांच्या सभेला लोकांची ढगफुटी होईल

दरम्यान, यापूर्वी ज्या ज्या वेळी शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्या प्रत्येक भूमिकांसोबत हा बीड जिल्हा साहेबांसोबत खंबीरपणे उभा राहिल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले.  आज जी सभा होणार आहे, या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असून लोकांची ढगफुटी होईल असं मत संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलंआहे. 

परळी विधानसभा मतदारसंघातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा ही नाशिकच्या येवलामध्ये घेतली. त्यानंतर दुसरी सभा मराठवाड्यात होत आहे. अजित पवारांना साथ देत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील बहुतेक नेते अजित पवारांसोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. म्हणूनच, शरद पवारांनी मराठवाड्यातील पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये ठेवल्याचे बोलले जात आहे. बीडमध्ये होणाऱ्या स्वाभिमान सभेमध्ये परळीतील बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पहिल्याच जाहीर सभेत परळी विधानसभा मतदारसंघातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन पवार यांनी धनंजय मुंडेंसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Sharad Pawar: शरद पवारांची आज बीडमध्ये पहिली 'स्वाभिमान सभा'; गुप्तभेटीवर भाष्य करण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget