एक्स्प्लोर

Beed: चिंता वाढवणारी बातमी; बीड जिल्ह्यात 30 दिवसात 30 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Farmer Suicide: गतवर्षीच्या तुलनेत यावेळी आत्महत्यांचा आकडा 54 ने अधिक आहे.

Farmer Suicide: एकीकडे राज्यात सत्तांतराचा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकरी गळ्याभोवती फास लावून आपला जीवन संपवत आहे. बीड जिल्ह्यातील गेल्या महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. कारण जून महिन्यातील 30 दिवसात 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा केली. पण याच दरम्यान बीड जिल्ह्यातील गेल्या सहा महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी धडकी भरणारी आहे. 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022  पर्यंत सहा महिन्यात 181 दिवसात 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यावेळी आत्महत्यांचा आकडा 54 ने अधिक आहे. तसेच गेल्या महिन्यात 30 दिवसात 30 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. 

कोविडचा फटका... 

कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांच्या छाताडावर बसले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मुलं शहरात कामासाठी स्थलांतर करतात. मात्र कोरोना काळात आलेली बेरोजगारी आणि हातातील काम गेल्याने ही मुलं पुन्हा गावाकडे आले. मात्र परत आल्यानंतर सुद्धा गावाकडची परिस्थिती काही बदलेली नसल्याने शेतकरी कुटुंब हतबल होत आहे. त्यात घेतलेलं कर्ज कसे फेडायचं याची चिंता, त्यामुळे बळीराजा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. 

पाऊसानेही पाठ फिरवली...

मराठवाड्यात फक्त 25 टक्के पाऊस झाला असून, अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद,जालना आणि बीड हे तीन जिल्हे सोडले तर विभागात अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. तर अनके ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. आधीच कर्ज काढून पिकांची लागवड केली, त्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार असल्याचे चित्र आहे. 

संबंधित बातम्या

Marathwada: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस; पाच जिल्ह्यात मात्र प्रतीक्षा

Marathwada Dam: मराठवाड्यातील अकरा मोठ्या धरणात 41 टक्के पाणीसाठा;जायकवाडी 33 टक्क्यांवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget