Karuna Sharma : 'धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली...'; करुणा शर्मांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, 'बहिणीवर बोलते म्हणून मला त्यांनी धमकी दिली'
Karuna Sharma : माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरुच आहे, यासंदर्भात तक्रार कोर्टात दिली आहे. याबाबत व्हाॅट्सॲप चॅट, एनसी देखील पुरावे देखील कोर्टात दिले आहेत, पोलिस तक्रार दाखल करतात, असंही शर्मांनी म्हटलं आहे.

Karuna Sharma : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखेच होते असा निकाल मुंबईतील माझगाव न्यायालयाने दिल्यानंतर आता करुणा शर्मा (Karuna Munde Dhananjay Munde)यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात केली आहे. धनंजय मुंडे आणि विरोधात दाखल झालेल्या याचिकेत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत प्रॉपर्टीची विक्री करण्यात येऊ नये हा अर्जही करुणा शर्मा यांनी कोर्टात केला आहे. या प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना करुणा शर्मा यांनी म्हटलं की, स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे.
स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली
पुढे बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या, मला 2 लाख पोटगी मिळाली, तेव्हापासून आणि आमदारकी रद्द होणार असं कोर्टाकडून नोटीस देण्यात आली, तेव्हापासून मला धमक्या येत आहेत. स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरुच आहे, यासंदर्भात तक्रार कोर्टात दिली आहे. याबाबत व्हाॅट्सॲप चॅट, एनसी देखील पुरावे देखील कोर्टात दिले आहेत, पोलिस तक्रार दाखल करतात. मात्र काही करत नाही. दबावतंत्र धमकी देण्याचे काम करत आहे, बहिणीवर बोलत आहे, म्हणून मला धनंजयने धमकी दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे...
ते किती पाण्यात आहेत, हे मी दाखवून देईल. एफआयआर करा असं मी सांगितलं होतं, मात्र काहीही केलं नाही. कोर्टात मी सांगितलं आहे, हे सगळं काल, कोर्टाने पोलिस संरक्षण द्या, असं सांगितलं होतं. मात्र, अद्यापही काही केलं नाही. मुलीला घेऊन जाणार अशी मला धमकी दिली जात आहे. पोटगीसंदर्भात कोर्टात याचिका लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली आहे. बदनामी करणार, तुकडे करणार असं मला धनंजय मुंडे बोललेत. मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे, त्यांनी वेळ नाही दिला, तरी मी मंत्रिमंडळ बैठकीला जाणार आहे आणि यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार आहे, लव्ह जिहादपेक्षा देखील अधिक जास्त माझ्यावर अन्याय होत आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
नेमकं काय आहे अर्जांमध्ये ?
- माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि एआयच्या माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
- माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला अजुनही धमक्या आणि आता एआयच्या माध्यमातून छळ सुरूच असल्याची तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
- तसेच कोर्टानं पोटगीबाबत दिलेल्या आदेशांनुसार 60 लाखांची वसुली आणि करूणा यांच्या मालकीच्या संपत्तीची विक्री करू नये असे आदेश देण्याची मागणी करत करूणा शर्मा यांनी कोर्टात नव्यानं अर्ज केले आहेत.
- कोर्टाच्या आदेशानंतरही धनंजय मुंडेंकडून धमक्या आणि छळ सुरूच -
- प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करूणा शर्मा यांनी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं नव्यानं अर्ज केला आहे.
- धमक्यांसोबत आपल्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले अश्लील व्हिडिओही पाठवले जात असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
- ज्या व्हीडिओ आणि फोटोत आपण नाही, तरीही त्यात आपणं असल्याचं दाखवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे.
- तसेच कोर्टानं दिलेल्या आदेशांनुसार दर महा 2 लाख रूपये या हिशोबानं साल 2022 पासून आपण आजवर 60 लाख रूपये पोटगीस पात्र असल्यानं त्याची कोर्टानं धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी अशी मागणीही करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
- तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही कोर्टानं जारी करावेत अशी मागणी करत तीन स्वतंत्र अर्ज करूणा शर्मा यांनी आपले वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कोर्टापुढे केले आहेत.























