एक्स्प्लोर

VIDEO : धनंजय आणि पंकजांनी असंच एकत्र राहावं, आमच्या तिघांची ताकद तुमच्यामागे उभी करू; परळीतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadanvis : आम्ही तिघे एकत्र आलो आहोत, आमचा ध्यास एकच आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

बीड: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राहावं, त्यांच्यामागे आम्ही उभे राहू असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केलं आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. त्यामध्ये फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे 'शासन आपल्या दारी'च्या (Shashan Aplya Dari) निमित्ताने एकत्र आलेले मुंडे बहीण-भाऊ आता बीडच्या राजकारणातही एकत्र येणार का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. 

देवेद्र फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती जनतेला दिली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना त्याचा फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांनाच आजच्या कार्यक्रमाची उत्कंठा लागली आहे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी असंच एकत्र राहावं, एका स्टेजवर राहावं. आमच्या तिघांची अशी ताकद तुमच्या मागे उभी करू की परळचीच काय बीडही आपलं असेल. परळी, बीडसोबत महाराष्ट्राचं कल्याण करू. हा मंच असाच राहो. 

माननीय मुख्यमंत्री वैज्यनाथ देवस्थानचा विकास आराखडा केंद्राकडून मंजूर करून आणणार आहेत. आम्ही तिघे एकत्रित आल्यानंतर आमच्या तिघांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही, आम्हाला शेजारच्या राज्यात प्रचारासाठी बोलवतात असा टोलाही त्यानी उद्धव ठाकरेंना लगावला. 

धनंजय मुंडे फडणवीसांच्या जवळचे

त्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. धनंजय मुंडे यांनी एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकालात महत्त्वाचे 75 निर्णय घेतल्याचं सांगत त्याचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे हे माझ्या तर जवळचे आहेतच, पण देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचे आहेत. 

धनंजय मुंडेंनी बहिणीला मारली मिठी

बीडमधल्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने गोपीनाथगडावर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची भेट झाली. त्यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहिणीला म्हणजे पंकजा मुंडे यांना मिठी मारली. 

VIDEO : Devendra Fadnavis Full Speech : दोघांनी एकत्र राहा, तिघांची ताकद तुमच्या पाठीशी, परळीत जाऊन ग्वाही!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणीRavikant Tupkar Meet CM, DCM : रविकांत तुपकरांनी घेतली फडणवीस, अजित पवारांची भेट,काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Embed widget