एक्स्प्लोर

Pankaja Munde: मोगलांना जसा सह्याद्री कळला नाही, तसा बीड जिल्हा आहे, इकडे गड आहेत पण तिथून राजकारण चालत नाही: पंकजा मुंडे

Pankaja Munde speech in Ashti: देवेंद्र फडणवीस 'बाहुबली' तर मी 'शिवगामी देवी'; सुरेश धसांच्या आष्टीत पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी. पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली.

बीड: आपण सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणता, तसेच मला बीडची जिल्हा काही वर्षांपूर्वी 'शिवगामी देवी' म्हणायचे. शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती.  देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या कॅबिनेटचे प्रमुख आहेत. त्यामुळे नेहमीच त्यांच्याविषयी मला आदरभाव वाटतो. त्यामुळे आज मला देवेंद्र फडणवीसांना बघताना मनात वेगळाच भाव आला. तो ममत्त्वाचा भाव होता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. 

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात बाहुबली चित्रपटातील संवाद वापरले. या चित्रपटात शिवगामी देवीचे वाक्य आहे की, 'मेरा वचनही है मेरा शासन'.त्याप्रमाणेच मी सुरेश धस यांना जाहीर वचन दिलं आहे, तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक, हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी सुरेश धस यांना अण्णा म्हणते. आम्ही तुम्हाला इज्जत देतो. यापूर्वी तुम्ही मुलाच्या लग्नाच्यावेळी मला साडी आणि पत्रिका घेऊन आला होतात. मी त्या लग्नाला आले होते. आता दुसऱ्या मुलाच्या लग्नात तुम्ही आमंत्रण दिलं तर मी नक्की येईन, नाही बोलावलं तर येणार नाही. पण आजचा कार्यक्रम हा शासकीय आहे आणि शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात कुठेही स्थान मिळाले असते तरी मी या कार्यक्रमाला आलेच असते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. पण माझंही भाग्य मोठं आहे.  मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'लाडकी' वाटते, मी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आले, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार निवडून येतात, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता.2019 मध्ये सहापैकी पाच आमदार निवडून आले. आतादेखील आमच्यासोबत अजित पवार गटाचे आमदार आहेत. आम्ही मरमर करुन आमदारांना निवडून आणले आहे. देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मी मंत्री झाले, थोडंस लक आमचं आहे. मी देवेंद्र फडणवीसांना जेवढं ओळखते, तेवढं मंचावरचं कोणी ओळखत नाही. मंचावर त्यांना बाहुबली म्हटल्याने ते थोडेसे ओशाळले आहेत. पण तुम्ही काम करा, कामाने किर्तीरुपाने उरा, हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

हा जिल्हा आहे ना, जसा मोगलांना सह्याद्री कळला नाही, तसा हा बीड जिल्हा आहे. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरुन राजकारण होतं, असं बाहेर वाटतं. पण गडांवरुन राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात. पण या जिल्ह्यात कोणी व्यक्तीला कोणी पूजत नाही. या जिल्ह्यातील माणूस विकासाच्या पाठीशी उभा राहिला आहे. ज्यामुळे ज्यांच्या बाप आमदार-खासदार नाही, असे लोकही बीड जिल्ह्यात आमदार झाले आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

आणखी वाचा

सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Embed widget