satish Khokya Bhosale Family Attack Case: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
सतीश खोक्या भोसले (Satish Khokya Bhosale) यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. चार महिला जखमी, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप.

satish Khokya Bhosale Family Attack Case: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला (Satish Khokya Bhosale, Khokya Bha) झालेल्या मारहाण प्रकरणात मारेकर्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को अंतर्गत दहा ते पंधरा जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात (, Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाईत सतीश भोसले सध्या कारागृहात आहे. काल (12 ऑक्टोबर) मध्यरात्री भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यानुसार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीची आज वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला (Satish Khokya Bhosale Family Attack Case)
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या (Satish Khokya Bhosale) कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये हा प्रकार घडला. टोळक्याच्या हातात दांडगे, कोयते, कुऱ्हाडी होत्या आणि त्यांनी कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला चढवला. महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण टोळक्याला कोणताही पाझर फुटला नाही. थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार करण्यात आले. या मारहाणीत सर्व महिला रक्तबंबाळ झाल्या. जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला आणि शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. प्राथमिक माहितीनुसार, अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता? असे म्हणत टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याचे समजते.
कोण आहे खोक्या उर्फ सतीश भोसले? (Satish Bhosale video)
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी अशी त्याची ओळख आहे. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर दहशत पसरवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. वनविभागाची कारवाई व घरात सापडलेल्या ऐवजामुळे बीडमध्ये व राज्यभर खोक्या भाईची एकच चर्चा होती. बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















