एक्स्प्लोर

Beed : बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी 169 जणांना अटक करण्याचे आदेश, काय आहे बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरण?

Beed District Bank Scam Case : बँक अपहार प्रकरणातील आरोपी सतत न्यायालयात तारखेसाठी हजर न राहिल्याने या सर्वच 169 आरोपी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

 बीड :  बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Beed District Central Co-Operative Bank) अपहार प्रकरणी 169 आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीडच्या (Beed News) जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2013 साली  मोठा अपहार झाला होता आणि याच प्रकरणी 169 आरोपीविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटक वॉरंट जारी केल्यानंतर वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सदर बँक अपहार प्रकरणातील आरोपी सतत न्यायालयात तारखेसाठी हजर न राहिल्याने या सर्वच 169 आरोपी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. राज्यभर गाजलेल्या बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अपहार करण्यात अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आले असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.  तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाले आहेत. 

काय आहे बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरण?

एके काळी 1100 कोटी ठेवी असलेली बीडची जिल्हा बँक  संचालक आणि अधिकारी यांच्या नियमबाह्य कर्ज वाटपामुळे अडचणीत आली. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वेगवेगळे साखर कारखाने , सुत गिरण्या , पणन संस्था , खाजगी उद्योग , यांना तब्बल 150 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले होत. यातील बरेच कर्ज भरण्यात आले आहे

ज्यांना हे कर्जवाटप केलं या संस्थाकडे पूर्वीची थकबाकी असताना आणि अनेक संस्था या बुडीत असल्याचे माहित असताना देखील शिक्षण संस्था जिल्ह्याबाहेरील कर्जदारांना जिल्हा बँकेच्या संचालकांनी  कर्ज वाटप केले होते. या सर्व कर्ज वाटपाच्या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने याच बीड जिल्हा बँकेवर शिवानंद टाकसाळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

आर्थिक गैरव्यवहार झाल्यानंतर शिवानंद टाकसाळे यांच्या ताब्यात बँक आल्यानंतर त्यांनी या संस्थांकडे कर्जाची वसुली सुरू केली. वारंवार आदेश देऊन देखील जिल्हा बँकेने दिलेल कर्ज वसूल होत नसल्याने शिवानंद टाकसाळे यांनी या संस्थां व कर्ज घेणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 

बँकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार व कर्ज बुडवल्याप्रकरणी 2013 साली 269 जणांवर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.  हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर यातील एकही आरोपी कोर्टात तारखेला हजर न राहिल्याने आता वडवणी कोर्टाने थेट या 269 जणांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तर याच प्रकरणातील तीन आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक केली आहे. 

बँक अपहार प्रकरणातील आरोपी सतत न्यायालयात तारखेसाठी हजर न राहिल्याने या सर्वच 169 आरोपी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केला आहे. राज्यभर गाजलेल्या बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अपहार करण्यात अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आले असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाली आहेत

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget