एक्स्प्लोर

बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद रंगणार; जयदत्त क्षीरसागर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवगण शिक्षण संस्था असून याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याने या कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे.

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर लाखो रुपयांच्या भृष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्याचा वाद रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळतय

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवगण शिक्षण संस्था असून याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याने या कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असून याची रितसर चौकशी करण्यात यावी व अन्याय झालेल्या या कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा  तसेच अन्याय झालेल्या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची आर्थिक व मानसिक नुकसानीपासून सुटका करण्याचे आश्वासन संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे  

आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप

नवगण शिक्षण संस्थेने प्रशासन चालवण्यासाठी एक असंवैधानिक समिती स्थापन केली असून समितीमध्ये डॉ.एस.एल.गुट्टे, डॉ.एस.एस.जाधव, डॉ.व्ही.टी.देशमाने आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी बीड येथील सौ.के.एस.के.महाविद्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असूनही महाविद्यालयात न थांबता दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थेअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दररोज भेटी देऊन तेथील कर्मचार्‍यांवर दबाव आणून प्रतिवर्षी मार्च एंडींग म्हणून एक पगार सक्तीने, दम देऊन वसूल करतात. या प्रकारामुळे संस्थेतील सर्व कर्मचारी भयभीत झाले असून सदरील समिती प्रत्येक दिवशी एका महाविद्यालयाला भेट देऊन प्रत्येक कर्मचार्‍याला स्वतंत्ररित्या बोलवून पैशाची मागणी करत आहे. 

आपण पैसे न दिल्यास आपली बदली करण्यात येईल, पदोन्नती रोखण्यात येईल, वेतनवाढी रोखण्यात येतील, रजा मंजुर करण्यात येणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे कर्मचार्‍यांचे खच्चीकरण होत असून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. तसेच युजीसीकडून मिळणार्‍या विविध अनुदानात अपहार होत असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली असून कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Embed widget