एक्स्प्लोर

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं काही प्रमाणत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain News : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं काही प्रमाणत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे अनेक भागात पाऊसच न पडल्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. परभणी, बीड, रायगड या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. खरीपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांच्यासाठी देखील हा पाऊस समाधानकारक मानला जात आहे. 

परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाची हजेरी 

परभणी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पाऊस आला आहे. पावसाने सर्वसामान्यांना दिलासा मात्र शेतकरी अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेतआहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरासह परिसरात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस तुरळक आणि कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आज दुपारनंतर ढग दाटून आले आणि काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, वातावरण प्रसन्न झाले आणि नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला. मात्र शेतीच्या दृष्टीने हा पाऊस अद्याप अपुरा असल्याचे चित्र आहे.

 केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात, शहरातील रस्ते झाले जलमय

बीडच्या केज शहरासह परिसरात गेल्या दोन तासांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसाने केज शहरातील रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी साचले आहे. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बीड जिल्ह्यात अद्यापही मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेत.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बदलापुरात पावसाची दमदार हजेरी; तर अंबरनाथ उल्हासनगरमध्ये ढगाळ वातावरण

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बदलापूर मध्ये सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र दुपारनंतर पावसाने जोर वाढवलाय. मागील तासाभरा पासून स्टेशन परिसर, कात्रप, बेलवली, वडवली, आणि पनवेल मार्गावर जोरदार पाऊस सुरू आहे. आठवडाभर विश्रांती घेतल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत होता. परंतु सध्या सुरू असलेल्या पावसाने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झालाय. तर तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगर मध्ये ढगाळ वातावरण आहे.

अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन

गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज अंबाजोगाई तालुक्यात दमदार पुनरागमन केले आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आकाश ढगाळून आले आणि वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कुंबेफळसह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सुकण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ, वरपगाव, राडी, सातेफळ आणि कानडी परिसरात आज दुपारी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.

दरम्यान अंबाजोगाई तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक तालुक्यांमध्ये अद्याप पेरणीयोग्य किंवा पिकांना जीवदान देईल असा मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उर्वरित भागातील बळीराजा अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड मध्ये पावसाची हजेरी 

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड मधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर पावसाने  दांडी मारली होती. अखेर आज उत्तर रायगड सह दक्षिण भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget