कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
बीड जिल्ह्यातील गेवराईत धक्कादायक घटना घडली आहे. कापूस आणि सोयाबीन पेरुनही ते न उगवल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Beed : बीड जिल्ह्यातील गेवराईत धक्कादायक घटना घडली आहे. कापूस आणि सोयाबीन पेरुनही ते न उगवल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेळीपालनासाठी वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी? यातून या तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं आहे. मुकुंद गंगाराम हिंगे (वय 25) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतात दुबार पेरणी केली असल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली.
नापिकी आणि शेळीपालनाच्या व्यवसायासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे कसे?
एकीकडे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाच्या व्यवसायासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे कसे तर दुसरीकडे सततच्या नापिकीमुळे गेवराईतील अवघ्या 25 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रानमळा येथील मुकुंद गंगाराम हिंगे या तरुणाने सोमवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी शेतामध्ये सोयाबीन कापूस आणि उसाचे पीक घेतले होते. मात्र त्यातून फारसे उत्पन्न झाले नाही. सदरील तरुणाने शेतात दुबार पेरणी केली असल्याचेही गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सिबिल खराब असल्याचे तांत्रिक कारण सांगत बँकेने कर्ज नाकारले
केवळ शेतीवरच कुटुंबाची गुजरान होत नसल्याने मुलाला हातभार लागावा यासाठी वडिलांनी मुकुंदला 2023 मध्ये रुद्रेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून 9 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज घेऊन दिले. मात्र गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने शेती करायची कशी आणि हे कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न या तरुण शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. नवीन पिकांसाठी आणि व्यवसायासाठी त्याने राष्ट्रीयकृत बँकेकडे चकरा देखील मारल्या मात्र सिबिल खराब असल्याचे तांत्रिक कारण सांगत बँकेने त्याला कर्ज नाकारले. खासगी क्रेडिट सोसायटीचे कर्ज डोक्यावर असताना राष्ट्रीयकृत बँकेनेही कर्जासाठी नकार दिल्याने मुकुंद हिंगे तीव्र मानसिक तणावाखाली होता. नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा आहे.
शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण, एसआयआर नोंदणी कामाला कंटाळून शिक्षकाने संपवलं जीवन
मुंबईसह देशभरात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. याची जबाबदारी बीएलओ म्हणून शिक्षकांवर देखील देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण आला आहे. या एसआयआर नोंदणी कामाला कंटाळून घाटकोपरच्या असल्फा विभागात असलेल्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उमा महेश त्रिलोटकर असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांनी वारंवार आपले पती आजारी असल्याने, तसेच कामाचा तणाव असल्याने आपल्याला हे काम शक्य नाही असे प्रशासनाला कळवले होते. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी शाळेतच हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सध्या त्यांच्यावर विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.मात्र याकामामुळे आपल्यावर तणाव आल्याने आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले.
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला






















