Beed News : मांजरा धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित, अवैध्य पाणी उपसा करणाऱ्यांवर होणार कारवाई
Beed News : मांजरा धरणाचे पाणी आता पिण्याासाठीच आरक्षित करण्यात आले आहे.
बीड : बीड (Beed), लातूर (Latur) आणि धाराशिव जिल्ह्याला पाणी हे मांजरा धरणातून (Manjara Dam) पुरवण्यात येतो. तर याच धरणातले पाणी आता पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे आता मांजरा धरण आणि नदीवरील सर्व पाणी हे फक्त पिण्यासाठीच वापरता येणार आहे. यासंदर्भातले आदेश पाटबंधारे उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले आहेत. राज्यात अनेक भागात जरी मुसळधार पावसाने हजेरी लावली असेल तरीही मांजरा धरण परिसरामध्ये अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही.
दरम्यान पाऊस न झाल्यामुळे मांजराच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे या धरणातील अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता धरणातील पाणी हे पिण्यासाठीच वापरण्यात येईल असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता मांजरा धरणातील पाणी हे फक्त पिण्यासाठीच वापरता येणार आहे.
आता कडक कारवाई करण्यात येणार
मांजरा धरणातून लातूर एमआयडीसी त्याचबरोबर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधील शेतीसाठी देखील पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्याने धरणातील पाणी फक्त आता पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आलं आहे. अर्धा पावसाळा संपला तरी तीन जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात मात्र मुबलक पाणीसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे या धरणातून अवैध्यरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आलीये.
शेतकरी चिंतेत
पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांना फटका बसत असतांना, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. कारण अनेक प्रकल्पातील पाणी आटले असून, काही ठिकाणी अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळू शकते.
पिकांचे नुकसान
जून जुलै महिन्यात जरी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरीही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने बरीच विश्रांती घेतली. त्यामुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच जर येत्या काही दिवसांत पुरेसा पाऊस पडला नाही तर दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांवर ओढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच यामुळे पिण्याचा पा्याचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यात सध्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.