एक्स्प्लोर

Beed News: मुंडे-धसांच्या वादात भाजपा जिल्हाध्यक्षांची निवड रखडली? कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणाले, 'पंकजा मुंडेंच्या सांगण्यावरूनच...'

Beed News: मुंडे-धसांच्या वादात भाजपा जिल्हाध्यक्षांची निवड रखडली अशी चर्चा सुरू असताना कार्यकारी जिल्हाध्यक्षांनी जिल्हाध्यक्ष मात्र पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरूनच असेल असं वक्तव्य केलं आहे.

बीड: भाजपाकडून राज्यातील बहुतांश ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. मात्र, बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही. याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. मात्र भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले नाहीत. अशातच राज्यात बहुतांश ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर बीडमध्ये मात्र अध्यक्ष पदाची निवड रखडलीय. या निवडीला मुंडे धसांच्या वादाची किनार असल्याचं बोललं जात असतानाच कार्यकारी जिल्हाध्यक्षांनी जिल्हाध्यक्ष मात्र पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरूनच असेल असं वक्तव्य केलं आहे.

नेहमीप्रमाणे भाजपच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षांनी मुंडे धस यांच्यातील वादाबद्दल न बोलता पुढील आठवड्यात रखडलेली निवड होईल असे सांगितले आहे. तसेच जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडे सांगतील तोच होईल असे देखील कार्यकारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले. मात्र अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग देखील लावून ठेवली आहे.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर कार्यकर्त्यांनी अविश्वास निर्माण केला. त्यानंतर मस्के यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या जागी शंकर देशमुख यांची कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. परंतु आता त्यांनाच पुढे या पदाची जबाबदारी दिली जाते की, आणखी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात भाजपाची कमांड मंत्री पंकजा मुंडे यांच्या हातात आली होती. सलग दहा वर्ष त्यांनी जिल्ह्यातील भाजपावर वर्चस्व राखले. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यावर आपले वर्चस्व आणले. परंतु सध्या धनंजय मुंडे अडचणीत आहेत. अशातच जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या निवडी आणि यापूर्वी मंडळ अध्यक्षांच्या झालेल्या निवडी निमित्त मुंडे आणि धस यांच्यातील सुप्त संघर्ष दिसून येतोय.

भाजप जिल्हाध्यक्षांची यादी 

  1. सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत
  2. रत्नागिरी उत्तर - सतीश मोरे
  3. रत्नागिरी दक्षिण - राजेश सावंत
  4. रायगड उत्तर - अविनाश कोळी
  5. रायगड दक्षिण - धैर्यशील पाटील
  6. ठाणे शहर - संदीप लेले
  7. ठाणे ग्रामीण - जितेंद्र डाके
  8. भिवंडी - रवीकांत सावंत
  9. मीरा-भाईंदर - दिलीप जैन
  10. नवी मुंबई - डॉ. राजेश पाटील
  11. कल्याण - नंदू परब
  12. उल्हासनगर - राजेश वधारिया
  13. पुणे शहर - धीरज घाटे
  14. पुणे उत्तर (मावळ) - प्रदीप कंद
  15. पिंपरी चिंचवड शहर - शत्रुघ्न काटे
  16. सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर
  17. सोलापूर पूर्व - शशिकांत चव्हाण
  18. सोलापूर पश्चिम - चेतनसिंग केदार
  19. सातारा - अतुल भोसले
  20. कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर
  21. कोल्हापूर पश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील
  22. सांगली शहर - प्रकाश ढंग
  23. सांगली ग्रामीण - सम्राट महाडिक
  24. नंदुरबार - निलेश माळी
  25. धुळे शहर - गजेंद्र अंपाळकर
  26. धुळे ग्रामीण - बापू खलाने
  27. मालेगाव - निलेश कचवे
  28. जळगाव शहर - दीपक सुयवंशी
  29. जळगाव पूर्व - चंद्रकांत बाविस्कर
  30. जळगाव पश्चिम - राध्येश्याम चौधरी
  31. अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर
  32. अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग
  33. नांदेड महानगर - अमर राजूरकर
  34. परभणी महानगर - शिवाजी भरोसे
  35. हिंगोली - गजानन घुगे
  36. जालना महानगर - भास्करराव दानवे
  37. जालना ग्रामीण - नारायण कुचे
  38. छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ
  39. छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते
  40. धाराशिव - दत्ता कुलकर्णी
  41. बुलढाणा - विजयराज शिंदे
  42. खामगाव - सचिन देशमुख
  43. अकोला महानगर - जयवंतराव मसणे
  44. अकोला ग्रामीण - संतोष शिवारकर
  45. वाशिम - पुरुषोत्तम चितलांगे
  46. अमरावती शहर - डॉ. नितीन धांडे
  47. अमरावती ग्रामीण (मोर्शी) - रवीराज देशमुख
  48. यवतमाळ - प्रफुल्ल चव्हाण
  49. पुसद - डॉ. आरती फुफाटे
  50. मेळघाट - प्रभुदास भिलावेकर
  51. नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी
  52. नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतराव राऊत
  53. नागपूर ग्रामीण (काटोल) - मनोहर कुंभारे
  54. भंडारा - आशु गोंडाने
  55. गोंदिया - सिता रहांगडाले
  56. उत्तर मुंबई - दीपक बाळा तावडे
  57. उत्तर पूर्व मुंबई - दीपक दळवी
  58. उत्तर मध्य मुंबई - विरेंद्र म्हात्रे

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget