एक्स्प्लोर

नाशिक पुन्हा हादरलं! पूर्वीच्या भांडणाचा राग, वीस वर्षीय तरुणाला भर रस्त्यात भोसकलं!

जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाने 20 वर्षीय तरुणांची धारदार शस्राने हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेने काही दिवसांपासून शांत असलेले नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. 

Nashik Crime News : नाशिकमध्ये एका घटनेनं (Nashik News Updates) खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाने 20 वर्षीय तरुणांची धारदार शस्राने हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेने काही दिवसांपासून शांत असलेले नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. 
 
नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. येथील मायको सर्कल परिसरात राहणारा रवी शिंदे हा रात्री 10ः30 ते 01ः00 वाजेच्या सुमारास कालीका नगर येथून घरी पायी जात किरण कोकाटे हा रिक्षाने पाठीमागून आला आणि अचानक रवीवर वार केला. यावेळी कोकाटे याने रवीच्या कमरेच्यावर धारदार शस्राने वार करत त्याला संपवलं.
 
दरम्यान रात्रीची वेळ असल्याने कोकाटे याने घटनास्थळावरून पळ काढला. रवीच्या वर्मी घाव बसल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात रात्रभर तणावाचे होते. रवी शिंदे यांच्या खुनाबाबत युसुफ अमीर सैयद यांनी किरण रमेश कोकाटे याच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड गंगाधर सोनवणे, सहा.पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. तसेच संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानंतर घटनास्थळी वपोनि विजय ढमाळ, वपोनी आंचल मुदगल यांनी भेट देत तपास सुरू केला.
 
हत्या केल्यानंतर आरोपी फरार, असं केलं अटक
 
त्यानुसार पंचवटी विभागातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव येथील गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या तीन टीम बनवून संशयित किरण कोकाटे याचा शोध पथके तयार करून रवाना करण्यात आली होती. त्याप्रमाणे पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून संशयित किरण कोकाटे याला सिडको, अंबड नाशिक येथून ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं रवि शिंदे याचा खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 
 
जुन्या भांडणावरून वाद
जुन्या भांडणाचे कारणावरून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या पुढील तपासाकरीता न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित नलवडे हे करत आहेत.
 
इतर महत्वाच्या बातम्या
 

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget