वाल्मिक कराडच्या कृष्णकृत्यांची पाळमुळं खणून काढणाऱ्या सुरेश धसांवर पहिला वार, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड यांच्याबाबत खुलासे करणारे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी जहरी टीका केली असून गंभीर आरोपही केलेत. ते म्हणाले..
Lakshaman Hake On Suresh DHas: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या कृष्णकृत्यांची पाळेमुळे खणून काढणाऱ्या सुरेश धसांवर लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केले आहेत. (Lakshman Hake on Suresh Dhas) प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र आणि देशभरात देवस्थानाची जमीन हडपली. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रॉड केला. असा गंभीर आरोप करत जातीचा अहमगंडातून धस यांना धनंजय मुंडे पालकमंत्री म्हणून नकोत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. राज्यात गेल्या महिनाभरापासून तापलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा दबाव वाढतोय. विरोधकांसह स्वपक्षीयांनीही त्यांना घेरल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी मैदानात उतरलेत. छत्रपती संभाजीनगर शहरात धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) टार्गेट केल्यावरून ओबीसी समाज बांधवांसह ते जोरदार निदर्शनं आणि आंदोलन करतायत.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक परिसरात लक्ष्मण हाके आज दुपारी बारा वाजता आंदोलन करणार आहेत. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड यांच्याबाबत खुलासे करणारे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी जहरी टीका केली असून गंभीर आरोपही केलेत. ते म्हणाले, प्रभू रामचंद्राच्या जमिनीचा उतारा धस यांनी आपल्या नावावर करून घेतलाय. प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्राने देशभरात देवस्थानची जमीन हडपली. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रॉड केला. सत्तेत असलेल्या मंत्र्यावर एसीबीची धाड पडून त्याच्या पीएकडे घबाड सापडलेले देशातील धस हे एकमेव नेते आहेत. असा आरोप लक्ष्मण हाके यांनी सुरेश धसांवर केलाय. सुरेश धस फडणवीस यांच्या गळ्यातील हाडूक होतील. जरांगेंची जागा धस यांनी घेतली आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. या दोघांच्या संघर्षातून आणि उदवेगातून घरात घुसण्याचे भाषा केली जात आहे. असंही हाके म्हणाले. विजय झाल्यानंतर स्वपक्षावर टीका करणारा आमदार कसा असू शकतो. त्यांच्या मनात जाती विषयी तेढ आहे. जातीच्या अहमगंडातून धस यांना धनंजय मुंडे पालकमंत्री नको आहेत अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली.
अंजली दमानियांवर जोरदार टीका
अंजली दमानिया यांना कोणी रसद पुरवत आहे का? कारण ते मुंबईहून बीडमध्ये येत असताना तर राजगुरुनगर येथे गेल्या नाहीत. त्यांच्याकडून ठरवून विषय केला जात आहे का? असा सवालही हाके यांनी केला. पुणे जिल्ह्यातील राजगुरू समाजातील गिरी गोसावी समाजाच्या चिमुरडीची हत्या झाली असतानाही शरद पवार तिथे भेटायला जात नाहीत. असंही हाके म्हणाले.
हेही वाचा: