Pritam Munde: आपल्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास केला गेला; खासदार प्रीतम मुंडे यांचे स्पष्टीकरण
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना ही आपल्या आवडीची योजना असून माध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केला असल्याचं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.
बीड: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेबद्दल केलेल्या आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी कशी हिताचे आहे हे सांगत असताना एक वक्तव्य केलं होतं. त्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप आता त्यांनी केलाय. माध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यात केल्याचं त्यांनी म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र पाहायला मिळालं होतं. मात्र यामुळे लोकसभेच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच असणार असल्याचं खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर काही निवडणुका जरी एकत्र लढल्या गेल्या असल्या तरी याचा लोकसभेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही असं त्या म्हणाल्या.
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे भावी खासदार असे बॅनर्स लागले असून यावर बोलताना खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, अद्यापतरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेल नाही. मात्र जो कोणी उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात असेल त्याचा सन्मानच केला जाईल.
मुंडे भाऊ-बहीण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व 21 संचालक बिनविरोध
वैधनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी एकत्रित येऊन उमेदवार ठरवले आहेत. कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी 9 मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यासाठी संचालक पदाच्या 21 जागांसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते तर 37 अर्ज मंजूर झाले.
गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये बहुतांश उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गटाचे आहेत. या कारखान्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केलेला नव्हता.
दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाजपला घरचा आहेर देताना खासदार प्रीतम मुंडे यांनी आंदोलकांशी चर्चा करायला कुणीही गेले नसल्याची खंत व्यक्त केली.
ही बातमी वाचा: