एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनावरुन लक्ष वळवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केल्याचा आरोप

Manoj Jarange Patil at antarwali sarati: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे उपोषण सोमवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, संध्याकाळी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा ठाण्याकडे वळल्या.

बीड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु केलेल्या आंदोलनावरुन लक्ष दुसरीकडे वळण्यासाठीच राज्य सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला, असा आरोप ऑल इंडिया पँथर संघटनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केला आहे. अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांकडून मुंब्रा परिसरात एन्काऊंटर करण्यात आला होता. तेव्हापासून या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरच्या टाईमिंगबाबत शंका उपस्थित केली आहे.

राज्य सरकारला मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि उपोषण हे रोखता येत नाही. त्यामुळेच मिडिया आणि ग्राऊंडवरुन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे एन्काऊंटर करण्यासाठीच अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले. हे राजकीय एन्काऊंटर आहे. येत्या 20 ते 25 दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे हे दिवस सरकारला काढणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनावरुन (Maratha Reservation) लक्ष हटवण्यासाठी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाने मनोज जरांगे यांची काळजी घ्यावी, असे आवाहन दीपक केदार यांनी मराठा समाजाला केले.

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर राज्यात आता जल्लोष केला जाईल, पेढे वाटले जातील. या सगळ्यात मनोज जरांगे यांचे आंदोलन उद्ध्वस्त होऊ नये, याची कळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपू शकत नाही,  असे दीपक केदार यांनी म्हटले.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांना सतत चक्कर येत आहे. तसेच मनोज जरांगे यांना जागेवर बसणे किंवा उभे राहणेही मुश्कील झाले आहे. 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून काही अंतरावर वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हेदेखील ठिय्या देऊन बसले आहेत. यामुळे सध्या जालन्यात मराठा आणि ओबीसी आंदोलनकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने मराठा आंदोलकांमधील खदखद वाढण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी काल अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला होता.

आणखी वाचा

मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, भिडा म्हटल तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले

अक्षय शिंदेला मारण्यापूर्वी पोलिसांनीच त्याचा खिशात 'तो' कागद ठेवला; अक्षयच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDevendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेलMahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget