एक्स्प्लोर

Ajit Pawar in Beed: मिटींग सुरु झाल्यावर हे माहिती नाही, ते माहिती नाही खपवून घेणार नाही, मला अप टू डेट माहिती हवेय; अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Ajit Pawar beed visit: अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, या दौऱ्यात धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. अजितदादांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. काहीवेळापूर्वीच अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले. अजित पवार (Ajit Pawar) आज जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी बीडच्या (Beed News) दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांनी सगळी माहिती तयार ठेवावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरमधून उतरताच पोलीस अधीक्षक, सीईओ आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सूचना केल्या आहेत. बीडमधील विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुल याबाबतची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. दुपारपासून मिटिंग सुरु होतील. मी सुरुवात केल्यावर मग याची माहिती नाही, त्याची माहिती नाही, असं चालणार नाही. आता मला काय माहिती हवी आहे, ते तुम्हाला सांगितलं जाईल. विमानतळ, रेल्वे लाईन, राष्ट्रीय महामार्ग असे बरेच मुद्दे काढले आहेत. आता साडेआठ वाजले आहेत, पुढच्या चार तासांमध्ये मला सगळी अप टू डेट माहिती हवी आहे. डिसेंबरपर्यंत आपल्याला सगळं मार्गी लावायचं आहे. शेवटच्या क्षणाला सगळं चालणार नाही. डिसेंबरपर्यंत क्वालिटीची कामं होतात की नाही बघणार, असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आपल्या पुढच्या दौऱ्याला निघून गेले. संध्याकाळी साडेपाच वाजता अजित पवार हे बीडमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्यासह हजर राहणार आहेत. त्यापूर्वी बैठकांमध्ये काय घडते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

अजित पवारांच्या दौऱ्यासाठी बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त

उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बीडच्या दौऱ्यावर असतील. त्यांच्या या दौऱ्यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात अजित पवार बैठकांना उपस्थित राहणार असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे. याबरोबरच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली असून शहराच्या विविध भागात मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुलाबी रंगाची थीम कायमच ठेवली असल्याचे या बॅनर्समधून दिसत आहे.

धनंजय मुंडे यांची गैरहजेरी

अजित पवार गेल्यावेळी बीडच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यापासून अंतर राखून आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या बीडमधील दौऱ्याला गैरहजर असल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. माननीय अजित पवारांच्या  आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबईला यावे लागले आहे. त्यामुळे  बीडमधील आजच्या  कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

धनंजय मुंडे पंकजांच्या 'त्या' फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते; अंजली दमानियांचा सनसनाटी दावा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget