कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा एल्गार; राज्यभरात कार्यकर्ते आक्रमक, थेट कृषिमंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा
कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीने सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. प्रहारच्या वतीनं राज्यभरात बच्चू कडूंचा प्रहार संघटनेचा कार्यकर्ते आक्रमक झालेय.

Prahar Janshakti Party Protest : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन वाढीचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर कुठलीही चर्चा करण्यात आली नाही किंवा दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही. त्यामुळं झोपलेल्या राज्य सरकारला जागा करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात बच्चू कडूंचा (Bachchu kadu) प्रहार संघटनेचा कार्यकर्ते (Protest) आक्रमक झालेय. कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीने सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. तर स्वत: बच्चू कडू हे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर थेट मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, भंडाऱ्यात सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली. तर तिकडे साताऱ्यातील शिवतीर्थावर मध्यरात्री प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत हे आंदोलन थबवलंय.
साताऱ्यातील शिवतीर्थावर मध्यरात्रीआंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सातारा शहरातील शिवतीर्थ पोवई नाका येथे प्रहार संघटनेच्या वतीने रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मशाल हातात घेऊन विविध मागण्यांसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, आणि पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे एमआरइसीएस अंतर्गत झाली पाहिजेत या प्रमुख तीन मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल हातात घेऊन रात्रीच्या सुमारास हे आंदोलन केले. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्याचा मला मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे सातारा शहर पोलिसांनी आंदोलकाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर मध्यरात्री टेंबा आंदोलन
आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु, असे आश्वासन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिले होते. परंतु, या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. कर्जमाफी करु असे आम्ही म्हटलोच नाही, असे वक्तव्य सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आसुड लिहीणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार संघटनेने सरकारविरोधात यल्गार पुकारला असून आज मध्यरात्री धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंभा आंदोलन करण्यात आले...
विधानसभा निवडणुकीपुर्वी सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू, असे ते म्हणाले होते. आम्ही शेतकऱ्यांचे पूत्र आहोत अशी जनतेला साद घालून ते निवडून आले. परंतु, आता कर्जमाफी बाबत चकार शब्दही बोलत नाही. शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे. राज्यात प्रत्येक दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे अहवाल सांगतो आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार हे आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा
























