हिंदू असो वा मुस्लिम, सर्व धर्मांसाठी राज्यघटना एक आहे, वक्फबाबतचा नवा कायदा त्याला अधिक बळकट करेल: बाबा रामदेव
Haridwar News : देशात सर्व धर्मांसाठी संविधान आहे, मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम, त्यामुळे वक्फबाबतचा नवीन कायदा ही व्यवस्था मजबूत करेल. असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केलाय.

Baba Ramdev on Waqf Amendment Bill 2025: देशभरात काल (6 एप्रिल) श्री रामनवमीचा उत्साह बघायला मिळाला. अशातच रामनवमीनिमित्त आयोजित एका ककार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाबाबत मोठे वक्तव्य केले. बाबा रामदेव म्हणाले की, भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या सर्वांसाठी एकच संविधान आहे, म्हणजेच सर्वांसाठी कायदा आहे. वक्फबाबत नवीन कायदा (Waqf Amendment Bill 2025) केल्याने ही व्यवस्था अधिक मजबूत होईल. काल (6 एप्रिल) रामनवमीनिमित्त दिव्य योग मंदिर (ट्रस्ट), कृपालू बाग आश्रम आणि दिव्य योग मंदिर राममुलख दरबार एकत्र आले. दिव्य योग मंदिर राम मुलख दरबार पतंजली योगपीठात विलीन झाले आहे. रामनवमी निमित्त उत्तराखंडमधील हरिद्वार (Haridwar News) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी हे विधान केलंय. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांवर बाबा रामदेव यांनी ही माहिती दिली.
वक्फ कायद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्वामी रामदेव म्हणाले, "भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध सर्वांसाठी समान संविधान आहे." वक्फ कायदा लागू झाल्याने ही व्यवस्था मजबूत होईल. वक्फ कायदा झाला नाही, तर देशभरातील विविध समाजाचे लोक स्वतंत्र मंडळे स्थापन करण्याची मागणी करत राहतील. ते म्हणाले की, काही राजकीय पक्ष मतांच्या राजकारणासाठी वक्फ कायद्याला विरोध करत आहेत. यावेळी बोलताना स्वामी रामदेव यांनीही उत्तराखंड सरकारने गावांची नावे बदलण्याचे समर्थन केले.
मुस्लिमांनाही माहीत आहे की त्यांचे पूर्वज राम हे आहेत- बाबा रामदेव
पश्चिम बंगालमधील रामनवमीच्या मिरवणुकीवरील बंदी उठवण्याबाबत स्वामी रामदेव म्हणाले, "व्होट बँकेचे ध्रुवीकरण करण्यासाठी असे निर्बंध राजकीयदृष्ट्या प्रेरित केले जातात. रामनवमी, जन्माष्टमी, ईद इत्यादी धार्मिक सणांवर कोणतेही बंधन नसावे. भारत हा सनातनचा देश, राम, कृष्ण, हनुमान, शिव यांचा देश आहे. यामध्ये सर्वांचा आदर आहे. कोणीही कोणाचा द्वेष करू नये. हिंदुत्व कोणाचाही द्वेष करत नाही. मुस्लिम देखील त्यांची श्रद्धा आणि धर्म पाळतात परंतु त्यांना हे देखील माहित आहे की राम हे त्यांचे पूर्वज आहे.
विलीनीकरणाबाबत स्वामी रामदेव म्हणाले की, तीस वर्षांपूर्वी संन्यास घेतल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेचे नाव दिव्य योग मंदिर (ट्रस्ट) ठेवले होते. नंतर आम्हाला कळले की योगेश्वर स्वामी राम लाल जी यांची संस्था दिव्य योग मंदिर राममुलख दरबार पूर्वीपासून आहे.दोन्ही संस्था आज एकत्र आल्या हा अद्भुत योगायोग आहे. योगाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी योगाचार्य स्वामी लाल महाराज यांनी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पतंजली योगपीठाला ही आहुति अर्पण केली आहे.
रामदेव बाबांसारखे कार्य याआधी कोणी केले नाही,भविष्यातही करू शकणार नाही
कार्यक्रमात पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आचार्य बाळकृष्ण यांनी तमाम देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, प्रभू रामाने आपल्या जीवनात, ऊर्जा, सेवा कार्ये आणि भावना जागृत कराव्यात जेणेकरून आपण परस्पर सौहार्दात एकरूप होऊन राष्ट्रसेवा आणि निर्मितीचे कार्य करू शकू. त्याचबरोबर योगाचार्य स्वामी लाल महाराज म्हणाले की, स्वामी रामदेवजी महाराज यांनी योगासने प्रत्येक घराघरात प्रसिद्ध करण्याचे जे कार्य केले आहे ते याआधी कोणी केले नाही आणि भविष्यातही कोणी करू शकणार नाही.
हे ही वाचा























