एक्स्प्लोर
आतापर्यंत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस
मुंबईः तब्बल दहा वर्षानंतर मान्सून पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीने पर्जन्यमान कमी असलं तरी दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यासाठी मात्र आशादायी वातावरण आहे. महाराष्ट्रात केवळ मराठवाड्यातच सरासरीप्रमाणे पाऊस पडला आहे.
जून महिन्यात जरा उशीराने का होईना मान्सूनचं आगमन झालं असलं तरी संपूर्ण देशात सध्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
महाराष्ट्रात विभागनिहाय पडलेला पाऊस
- विदर्भः सरासरी 71.6 मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात आतापर्यंत 43.4 मिमी म्हणजे 39 टक्के कमी पाऊस झाला आहे.
- मध्य महाराष्ट्रः या काळात सरासरी 76.3 मिमी पाऊस पडतो. सध्या 45.8 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस पडला आहे.
- मराठवाडाः सरासरी 79.5 मिमी पाऊस पडणं अपेक्षित होतं, मात्र सध्या 45.8 मिमी म्हणजे सरासरीच्या 17 टक्के कमी पाऊस पडला आहे.
- कोकणः कोकणसह गोव्यात सरासरी या काळात सरासरी 331.4 मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत सरासरीच्या 47 टक्के कमी म्हणजे 176.4 मिमी एवढा पाऊस पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement