New Bike News: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha ने MT15 चे नवीन जेन व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनीने याचे नाव Yamaha MT15 V2.0 असे ठेवले आहे. ही अपडेटेड स्पोर्ट्स बाईक R15 V4 वर आधारित आहे. जी सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च झाली होती. कंपनीने आपल्या या बाकीचे प्री-बुकिंग या महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू केले होते.  


कंपनीने याचे जुने मॉडेल काही महिन्यांपूर्वी बंद केल्यानंतर आता नवीन MT-15 लॉन्च करण्यात आली आहे. 2022 MT-15 चार रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. यात सायन स्टॉर्म (नवीन), रेसिंग ब्लू (नवीन), आइस फ्लूओ-वर्मिलियन आणि मेटॅलिक ब्लॅक रंगाचा समावेश आहे. Yamaha MT15 V2.0 ची प्रारंभिक किंमत 1.6 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.


R15 V4 च्या विपरीत MT15 च्या डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल पाहायला मिळाले नाही. याच्या सिग्नेचर डिझाइनमधील बहुतेक घटकांमध्ये सिंगल-पॉड प्रोजेक्टर LED हेडलॅम्प्ससह आयब्रो आकाराच्या LED DRL चा समावेश आहे. इतर स्टाइलिंग हायलाइट्समध्ये मस्क्यूलर बॉडीवर्क आणि साइड स्लंग अपस्वेप्ट एक्झॉस्ट मफलर यांचा समावेश होतो.


इंजिन 


Yamaha MT-15 मध्ये VVA तंत्रज्ञानासह 155cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 10,000rpm वर 18.4 PS पॉवर आणि 7,500rpm वर 14.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या : 



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI