Hyundai Creta Knight : कार उत्पादक कंपनी ह्युंदाई ( Hyundai) ने क्रेटाची सर्वात स्वस्त कार भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. आतापर्यंत ह्युंदाई क्रेटा ( Hyundai Creta ) चार ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपल्पद्ध होती. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड  एटी (Creta AT) , 6-स्पीड आईवीटी (Creta ITV) आणि 7-स्पीड DCT चा समावेश होता. ह्युंदाईने आता SUV रेंजमध्ये नाईट क्रेटा आणि 6-स्पीड iMT लान्च केली आहे. याबरोबरच ह्युंदाई कंपनीने 1.4-लिटर टर्बो DCT SX आणि 1.5-लिटर डिझेल AT SX हे मॉडेल बंद केले आहेत. 


जाणून घ्या किंमत!
ह्युंदाईच्या क्रेटामध्ये (Creta iMT ) 1.5-लीटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे.  क्रेटा कारच्या नाईट मॉडेलच्या केबिनमध्ये ब्लॅक थीम, चकचकीत-ब्लॅक सेंटर कन्सोल, स्टीयरिंग व्हीलवर रंगीत स्पॉट आणि AC व्हेंट्सवरही रंगीत डिझाईन आहे. विशेष म्हणजे ह्युंदाईची ही नवी क्रेटा कार पेट्रोल आणि डिझेलमध्येही उपलब्ध आहे. ही कार 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 7-स्पीड IVT युनिटशी कनेक्ट आहे. क्रेटाच्या एस प्रकारातील कारची किंमत  12.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. 


क्रेटाच्या नाइट मॉडेलमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ही कार सिंगल आणि ड्युअल टोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्युंदाईने क्रेटाच्या या नव्या मॉडेलमध्ये भन्नाट फिचर्स दिले आहेत. ब्लॅक-आउट अलॉय व्हील, समोर आणि मागील स्किड प्लेट्सवर ग्लॉसी-ब्लॅक फिनिश, रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर, सी-पिलर, रूफ रेल, ORVM सह बूट लिडवर नाईट मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.   


जाणून घ्या क्रेटा नाईट पल्सची किंमत


क्रेटा 1.5L पेट्रोल MT S+ नाइटची भारतीय बाजारात 13.35 लाख रूपये एवढी  किंमत आहे. याबरोबरच क्रेटा 1.5L पेट्रोल iVT SX(O) नाइटची किंमत 17.06 लाख रूपये आहे. क्रेटाच्या  1.5L डिझेल MT S+ नाईट मॉडेलची किंमत 14.31 लाख रूपये आहे. शिवाय क्रेटाच्या 1.5L डिझेलच्या ( S+ नाइट)  ची किंमत 18.02 लाख रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या



Car loan Information:

Calculate Car Loan EMI