Tata Curvv first look review : Tata ने Curvv coupe SUV संकल्पनेचे मॉर्डनाईझ करून त्यांच्या कारच्या नव्या व्हर्जनच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. Curvv SUV 2024 मध्ये भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos च्या  बरोबरीनेच आता टाटादेखील नव्या मॉडेलसह बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. नुकताच या कारचा फस्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. या निमित्ताने जाणून घ्या कारचा संपूर्ण रिव्ह्यू. 


टाटाने असे म्हटले आहे की, तरुण खरेदीदारांना काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. Curvv ला सफारी आणि हॅरियरसारखे लो-सेट हेडलॅम्प तसेच बोनेटवर एक मोठे LED पॅकेज मिळते जे फक्त Curvv च्या EV व्हर्जनमध्ये दिले जाणार आहे. 


Curvv संकल्पनेसह पाहिलेले काही तपशील टाटा मोटर्स EVs ची भविष्यातील डिझाइन भाषा देखील दर्शवतात. या कारच्या आतमध्ये जर पाहिले तर यामध्ये लांबीचे एलईडी लाईट्स आणि किमान रेषांसह साधी ग्रिल डिझाइन दिलेली आहे. फ्लश डोअर हँडल्स आणि काही डिझाईन डिटेल्समुळे ही अधिक आकर्षक बनते. टाटाचा फ्रंट लूक खरंतर सिएरा मॉडेलच्या संकल्पनेतून घेतलेला आहे आणि तो नेक्सॉनपेक्षा खूप मोठा आहे. परंतु हॅरियरपेक्षा थोडा लहान आहे. संकल्पनेत 20 इंच व्हिल्स आणि क्लेडिंग आहेत. मागील बाजूस पूर्ण LED लाइट बार देखील आहे. ज्यामुळे कार पुन्हा रुंद दिसते. नवीन मॉडेल आकर्षक दिसते यात तर शंकाच नाही.  


तीच गोष्ट आतून साध्या दिसणार्‍या केबिनची आहे. यामध्ये टचस्क्रीनसह दोन स्क्रीन आहेत ज्यामध्ये सर्व कंट्रोल आहेत. कारमध्ये एक राउंड गीअर सिलेक्टरसुद्धा देण्यात आला आहे. नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील अप्रतिम आहे. टाटाने जे काही नवीन मॉडेल आणले आहे यातून ही कार भविष्यातील इलेक्ट्रोनिक व्हेहिकलसाठी सिग्नेचर कार म्हणून याकडे पाहिले जाईल. 


टाटाच्या डिझाईन लँग्वेजमध्ये नंबर प्लेट स्लॉटच्या वर एक मोठा बार आहे. या कारसाठी ती तशीच ठेवली जावी अशी अपेक्षा आहे. एकूण डिझाईन ही सध्याच्या टाटा स्टाइलिंग व्हर्जनची उत्क्रांती आहे. हॅप्टिक कंट्रोल्स, नवीन क्लायमेट इंटरफेस तसेच ड्युअल डिजिटल स्क्रीनसह नवीन टू-स्पोक स्टीयरिंग हे या यादीत अग्रस्थानी आहे. नवीन सेंटर कन्सोलवर डिटेल्सनुसार पाहिल्यास ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, एक CNG बटण, ऑटो-पार्क आणि 360-डिग्री कॅमेरा दिसून येतो. हे एक प्रकारचे सूचक आहे जे टाटाच्या पुढच्या व्हर्जनमध्ये येण्याची अपेक्षा आहे. 


नेक्सॉन आणि टिगोर EV सारख्या Gen-1 कारच्या क्षमतेमध्ये 400-450km च्या रेंजसह Curvv प्रथम EV म्हणून येईल. कंट्रोलेबल रीजनरेशन वैशिष्ट्यीकृत करणारी ही पहिली टाटा ईव्ही असेल जी तुम्ही हायवेवर असल्यास पूर्णपणे बंद केली जाऊ शकते असे टाटा म्हणते. टाटाने असेही संकेत दिले आहेत की जर मागणी असेल तर त्याच्याकडे विविध किमतीच्या स्तरांसाठी अनेक बॅटरी क्षमतेचे ऑप्शन्स असतील. ICE व्हर्जन पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन्ससह ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे. 


Tata ने म्हटले आहे की Curvv ची उत्पादन-तयार व्हर्जन 2024 मध्ये लॉन्च केले जाईल. EV  व्हर्जनमध्ये आम्ही लवकरच ICE बेस्ड मॉडेल्सची अपेक्षा करतो. ही कार लॉन्च केल्यावर Hyundai Creta, Kia Seltos, Nissan Kicks तसेच मारुती सुझुकी आणि Toyota च्या भविष्यातील SUV मॉडेल्सना दमदार टक्कर देईल यात मात्र शंका नाही. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI