Maruti Suzuki Next-Gen Ertiga Pre-Booking Starts: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली MUV Ertiga चा अपडेट मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनीने याची प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे. स्टोक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले आहे की, भारताची आवडती MUV Ertiga लवकरच नवीन अवतारात लॉन्च होणार आहे.


नेक्स्ट जनरेशन अर्टिगा 


नेक्स्ट-जनरल एर्टिगा के-सीरीज 1.5L ड्युअल जेट प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह ड्युअल VVT इंजिनद्वारे समर्थित आहे. कंपनीची नेक्स्ट-जनरल एर्टिगा पॅडल शिफ्टर्ससह अपग्रेड केलेल्या 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनद्वारे समर्थित असेल. ज्यामुळे ही कार ग्राहकांसाठी अधिक आरामदायी ठरणार आहे. नवीन डिझाइन, कमी इंधन वापरसह नेक्स्ट-जन एर्टिगा नवीन युगातील टेक्नॉलॉजी आणि फीचर्सने सुसज्ज आहे. सुझुकी कनेक्ट आणि 17.78 सेमी (7 इंच) स्मार्टप्ले प्रो टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह नेक्स्ट-जनरल एर्टिगा ग्राहकांना एक वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. पुढील पिढीची Ertiga S-CNG आता ZXI प्रकारातही उपलब्ध असेल.


नेक्स्ट जनरेशन एर्टिगासाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा करताना कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विक्री आणि विपणन) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड 750,000 पेक्षा जास्त ग्राहकांसह एर्टिगा एमपीव्ही भारताच्या मार्केटमध्ये गेमचेंजर ठरली आहे. आम्हाला नेक्स्ट जनरेशन अर्टिगा सादर करताना आनंद होत आहे. ही नवीन कार अधिक स्पेस, टेक्नॉलॉजी आणि सेफ्टीने सुसज्ज आहे. तसेच ही कार ग्राहकांसाठी अधिक आरामदायी कार ठरणार आहे.


कशी कराल बुक 


तुम्ही देशातील कोणत्याही मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये नेक्स्ट-जेन एर्टिगाची प्री-बुकिंग करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही www.marutisuzuki.com या वेबसाइटला भेट देऊनही कार बुक करू शकता. नेक्स्ट-जेन अर्टिगाचे बुकिंग 11,000 रुपये भरून केले जाऊ शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI