वाहने स्वस्त होण्याची आशा! जीएसटीचे दर कमी करून सरकार दुचाकी खरेदीदारांना दिलासा देणार?
कोरोनाच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी घट झाल्याने सरकारने वाहनांवरील जीएसटीचे दर कमी करावेत अशी मागणी केली जात आहे.
नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे वाहनांची मागणी कमी झाली आहे, या पार्श्वभूमीवर सरकारने जीएसटी कमी केल्यास दुचाकी वाहनांच्या किंमती कमी होतील अशी आशा निर्माण झाली आहे. कारण पुढील महिन्यात सादर होणाऱ्या 2022 च्या अर्थसंकल्पात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स (FADA) ने दुचाकीवरील जीएसटी दर 18 टक्के कमी करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यास मागणीच्या आघाडीवर दिलासा मिळेल.
दुचाकी हे लक्झरी उत्पादन नाही. त्यामुळे जीएसटी दर कमी करण्याची गरज आहे असं आहे असं फाडा संघटनेचं म्हणणं आहे. देशातील 15,000 हून अधिक ऑटोमोबाईल डीलर्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या संघटनेने टू-व्हीलर वरील जीएसटी 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती वित्त मंत्रालयाला केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
जीएसटी कपातीमुळे दुचाकींची मागणी वाढ?
दुचाकी ही चैनीची वस्तू म्हणून वापरली जात नसल्याचे एफडीएने म्हटले आहे. सर्वसामान्य लोक दैनंदिन कामाचा निपटारा करण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यामुळे २८ टक्के जीएसटीसह २ टक्के उपकर लावणे योग्य नाही. लक्झरी उत्पादनांवर सेस लावला जातो. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने वाहनांच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. अशा परिस्थितीत, जीएसटी दर कमी केल्याने खर्चात घट आणि मागणी वाढण्यास मदत होईल.
10 वर्षातील सर्वात कमी विक्री
SIAM ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोटरसायकल-स्कूटर आणि मोपेडच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. एप्रिल 2021 ते डिसेंबर या कालावधीत दुचाकी विक्रीने गेल्या दशकातील नीचांकी पातळी गाठली आहे. 2020 च्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये कमी वाहनांची विक्री झाली. 2020 च्या याच कालावधीत दुचाकींच्या एक कोटी युनिटची विक्री झाली. मात्र, या काळात प्रवासी कार आणि प्रीमियम कारच्या विक्रीत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Kia Carens : अलिशान किआ कॅरेन्सला तुफान पसंती, पहिल्याच दिवशी 7 हजार 738 बुकिंग्ज
- Kia Carens : अलिशान किआ कॅरेन्ससाठी प्री-लॉन्च बुकिंग सुरु
- Kia Carens: पाच प्रकारांत भारतात लॉन्च होतील Kia Carens,प्रत्येक प्रकारांत मिळतील वेगवेगळे कमालीचे फीचर्स