एक्स्प्लोर

Volkswagen च्या बेस्ट सेलर कारचा Exclusive Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Volkswagen Tiguan Exclusive Edition: वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगनने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एसयूव्ही कार Tiguan चा Exclusive Edition लॉन्च केला आहे.

Volkswagen Tiguan Exclusive Edition: वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगनने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एसयूव्ही कार Tiguan चा Exclusive Edition लॉन्च केला आहे. नवीन रंग पर्यायांसह या कारमध्ये बरेच कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे ही कार खूपच आकर्षक वाटत आहे. Tiguan च्या या स्पेशल एडिशनची किंमत 33.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच कारच्या फीचर्स आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

फोक्सवॅगन टिगुआनच्या नवीन एक्सक्लुझिव्ह एडिशनमध्ये याचा प्युअर व्हाइट आणि ओरिक्स व्हाईट रंग सर्वाधिक लक्ष वेधून घेतो. यामुळे ही कार इतर कारपेक्षा वेगळी वाटते. तसेच याच्या बूटलिडवर एक 'एक्सक्लुझिव्ह एडिशन' बॅजिंग देखील दिसत आहे. या एसयूव्हीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, यात 18-इंच सेब्रिंग स्टर्लिंग सिल्व्हर अलॉय व्हील्स, डायनॅमिक हबकॅप्स, एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प्स आणि अॅल्युमिनियम पेडल्स देण्यात आले आहेत. तसेच यात 6-एअरबॅग्ज, पॅनोरामिक सनरूफ, ड्रायव्हर अलर्ट सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, हिल स्टार्ट असिस्ट, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल या सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिन आणि किंमत 

याच्या आधीच्या मॉडेलप्रमाणे यातही 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बो-चार्ज केलेले पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 187bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच कंपनीची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम देखील यामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. या एसयूव्हीच्या सध्याच्या फेसलिफ्ट मॉडेलची किंमत 31.99 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. या स्पेशल एक्सक्लुझिव्ह एडिशनची एक्स-शोरूम किंमत 33.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Citroen C5 Aircross शी होणार स्पर्धा 

दरम्यान, ही कार भारतीय बाजारपेठेत नुकत्याच लॉन्च झालेल्या Citroen च्या C5 Aircross शी स्पर्धा करेल. फेसलिफ्टेड Citroen C5 Aircross मध्ये 2.0-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 174bhp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 36.67 लाख रुपये आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Samruddhi Mahamarg : नऊ एअरबॅग्ज, फक्त 7.4 सेकंदात पकडते 100 kmpl वेग; फडणवीस चालवत असलेल्या कारची किंमत जाणून व्हाल थक्क

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Embed widget