एक्स्प्लोर

Virtus Alpha: जबरदस्त रेंज... फास्ट चार्जिंग सपोर्ट; फक्त 16 हजार रुपयांची इलेक्ट्रिक सायकल लॉन्च

Virtus Motors नं त्यांच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांची नवी अल्फा इलेक्ट्रिक सायकल सीरिज लॉन्च केली आहे. सुरुवातीच्या ग्राहकांना ही सायकल अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी कंपनीनं काही अटीही निश्चित केल्या आहेत.

Virtus Motors Alpha Electric Bicycle: देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, Virtus Motors नं आज देशांतर्गत बाजारात इलेक्ट्रिक सायकलची  (Electric Bicycle) नवी अल्फा सीरिज ( Alpha Electric Bicycle ) लॉन्च केली आहे. यामध्ये 'Alpha A' आणि 'Alpha I' अशा दोन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करण्यात आल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, या नवीन सीरिजमुळे पारंपारिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील (Electric Cycle) अंतर भरून काढण्यास मदत होईल.             

Alpha सीरिजची वैशिष्ट्य

दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्समध्ये 8.0 Ah क्षमतेचा फिक्स्ड बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याच्या समोरील बाजूस डिस्क ब्रेक मिळतो आणि कंपनीचा दावा आहे की, त्यांची सिंगल-स्पीड डिझाइन सर्व प्रकारच्या रस्त्यांवर कोणत्याही अडथळ्याशिवाय चालते. या सायकल्समध्ये अनेक यूजर फ्रेंडली फिचर्स देण्यात आले आहेत, जे या सायकलची क्षमता आणखी वाढवतात. याला 1-इंच एलसीडी स्क्रीन मिळते, जी थ्रॉटलजवळ लावण्यात आली आहे. या डिस्प्लेवर तुम्हाला रिअल टाईम माहिती मिळते.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीनं 250W क्षमतेची इलेक्ट्रिक हब मोटर दिली आहे, जी 36V 8AH बॅटरी पॅकनं सुसज्ज आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, ही सायकल 30 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते, तर पेडल सपोर्टसह, ही रेंज 60 किमीपर्यंत वाढते. या सायकलचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे आणि वजन फक्त 20 किलो आहे. ट्यूब टायर, पुढील आणि मागील डिस्क ब्रेकसह सुसज्ज असलेल्या या सायकलमध्ये MTB फ्रेम आणि इनबिल्ट बॅटरी पॅक आहे. बॅटरी लेव्हल, ओडोमीटर, स्पीडोमीटर अशी माहिती सायकलच्या डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहे.

किंमत आणि व्हेरियंट्स 

कंपनीनं आपल्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त या सायकल लाँच केल्या आहेत. त्यामुळे कंपनी याला खास किंमतीत ऑफर करत आहे. त्याची मूळ किंमत 24,999 रुपये आहे, परंतु पहिल्या 50 ग्राहकांना ही सायकल केवळ 15,999 रुपयांमध्ये मिळेल. यानंतर, पुढील 100 ग्राहकांसाठी 17,999 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, विशेष सूट कालावधी दरम्यान, ही सायकल 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ही सायकल दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये राखाडी आणि निळा या रंगांचा समावेश आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या इलेक्ट्रिक सायकल्स तुम्ही बुक करु शकता.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महिंद्राची नवी 9-सीटर बोलेरो निओ प्लस; पॉवर अन् परफॉर्मन्सचं जबरदस्त कॉम्बिनेशन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget