Santro ला लागला कायमचा ब्रेक; Hyundai ने बंद केलं उत्पादन
Huyundai Santro: भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार असलेल्या सँट्रोला आता कायमचा ब्रेक लागला आहे. वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने सँट्रोचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Huyundai Santro: भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार असलेल्या सँट्रोला आता कायमचा ब्रेक लागला आहे. वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने सँट्रोचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारच्या कमी किंमत आणि फीचर्समुळे लोकांच्या मनात एक खास ओळख निर्माण झाली होती. ही अशी कार आहे, ज्याने कार खरेदी करण्याचे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र आता ही कार इतिहासात जमा होणार आहे. कंपनीने या कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय अखेर का घेतला, हे आपण जाणून घेणार आहोत.
Hyundai ने आपली Santro हॅचबॅक बंद करण्याचा निर्णय घेतला, ही माहिती ET Auto ने एका अहवालाद्वारे शेअर केली आहे. याचा अर्थ असा की नजीकच्या भविष्यात तुम्ही Santro हॅचबॅक खरेदी करू शकणार नाही.
कंपनीने का घेतला हा निर्णय?
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि त्याचवेळी एंट्री सेगमेंटच्या कारची मागणीही कमी झाली आहे. ह्युंदाई मोटरने भारतातील हॅचबॅक सँट्रो एंट्री सेगमेंट बंद करण्याचा निर्णय घेण्याचे हे मुख्य कारण आहे.
सँट्रोची किंमत किती?
हॅचबॅक सँट्रोबद्दल बोलायचे तर, 2018 मध्ये, ही कार भारतीय बाजारपेठेत 3.9 लाख ते 5.5 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च झाल्यानंतर 4 वर्षात या वाहनाच्या किमतीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर याची किंमत 5.7 लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढली. गेल्या 6 महिन्यांत दर महिन्याला या कारच्या केवळ 1500 ते 2000 युनिट्सची विक्री झाल्याचे अहवालात समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Review: नवीन फीचर्स आणि जबरदस्त लूकसह अशी आहे 'Nexon EV Max'
Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत
Upcoming Electric Cars: भारतात लवकरच लॉन्च होणार 'या' तीन नवीन इलेक्ट्रिक कार