Toyota Innova HyCross MPV: टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Toyota Innova HyCross MPV Launched in India: Toyota Kirloskar Motor ने बुधवारी आपली नवीन Toyota Innova Hycross MPV भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
Toyota Innova HyCross MPV Launched in India: Toyota Kirloskar Motor ने बुधवारी आपली नवीन Toyota Innova Hycross MPV भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. टोयोटाने आपली ही कार नोव्हेंबरमध्ये सादर केली होती. त्यानंतर आता त्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. Toyota Innova HyCross ची किंमत 18.30 लाखांपासून सुरू होते आणि 28.97 लाखांपर्यंत जाते. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. हे सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (SHEV) आहे. सेल्फ-चार्जिंग हायब्रिड व्हेरिएंट ZX(O), ZX आणि VX या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. VX व्हेरिएंट 7-सीटर आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये विकली जाणार आहे. पेट्रोल व्हर्जन दोन ट्रिममध्ये उपलब्ध असेल - G आणि GX, दोन्ही व्हर्जन 7-सीटर आणि 8-सीटर ट्रिममध्ये उपलब्ध आहेत.
इनोव्हा हायक्रॉस टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (TNGA) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. इनोव्हा क्रिस्टा ही ladder-फ्रेम चेसिसवर आधारित होती. जी फॉर्च्युनर एसयूव्ही (ladder) आणि हिलक्स पिक-अप ट्रकला देखील पॉवर देते. TNGA प्लॅटफॉर्म एक मोनोकोक चेसिस आहे. ज्याने इनोव्हा हायक्रॉसची ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि राइड गुणवत्ता सुधारली आहे.
Toyota Innova HyCross MPV Launched in India: इंजिन
नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस 2 पेट्रोल व्हेरिएंट आणि 3 हायब्रिड व्हेरिएंटमध्ये विकली जाईल. नवीन इनोव्हा हायक्रॉस TNGA 2.0L ला 5व्या जनरेशन सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टीम मिळते. ज्यामध्ये 4 सिलेंडर गॅसोलीन इंजिन आणि ई-ड्राइव्ह अनुक्रमिक शिफ्टसह मोनोकोक फ्रेम 137 kW (186 PS) चे पॉवर आउटपुट जनरेट करते. ही कार सेगमेंट मायलेजमध्ये सर्वोत्तम. ही कार 128 kW (174 PS) उत्पादन करणाऱ्या निवडक ग्रेडमध्ये डायरेक्ट शिफ्ट CVT शी जोडलेले TNGA 2.0L 4-सिलेंडर गॅसोलीन इंजिनसह येते.
Toyota Innova HyCross MPV Launched in India: डिझाइन
नवीन इनोव्हा हायक्रॉस मजबूत असून याचा डिझाइन जबरदस्त आहे. ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेईल, यात काहीच शंका नाही. याची बोनेट लाइन, एक मोठी षटकोनी गनमेटल फिनिश ग्रिल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्स, सुपर क्रोम अलॉय व्हील्स आणि एक मोठा बंपर याच्या मजबूत लूकमध्ये आणखी भर घालतात.
Toyota Innova HyCross MPV Launched in India: फीचर्स
नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये हवेशीर फ्रंट सीट भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची काळजी घेते. यात JBL प्रीमियम 9 स्पीकर सिस्टमसह 25.65 सेमी (10.1-इंच) कनेक्ट केलेला डिस्प्ले ऑडिओ, दुसऱ्या रांगेसाठी सेगमेंट-फर्स्ट पॉवर्ड ऑटोमन सीट्स आणि मल्टी-झोन A/C सारखे फीचर्स यात मिळतात.