Toyota Cars Price Hiked : टोयोटा (Toyota) कंपनीने त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. टोयोटाच्या दोन गाड्यांच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जाणून घ्या या वाहनांची नवीन किंमत काय आहे?


दोन वाहनांच्या किंमतीत वाढ


टोयोटा कंपनीने आपल्या दोन वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर कारचा समावेश आहे. इनोव्हा क्रिस्टलच्या किमतीत तब्बल 23,000 रुपयांनी आणि फॉर्च्युनरच्या किमतीत 77,000 रुपयांनी वाढ झाली आहे. Innova Crysta च्या GX MT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत रु. 17.45 लाख आहे, तर त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंट ZX AT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत आता 23.83 रुपये आहे. तर, इनोव्हा क्रिस्टलची डिझेल कार आता 19.13 लाख ते 26.77 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. टोयोटा फॉर्च्युनरच्या 7-सीटर व्हेरिएंटची किंमत 32.59 लाख रुपये आणि त्याच मॉडेलच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटची किंमत 34.18 लाख रुपये इतकी झाली आहे. त्याच्या 4X2 मॅन्युअल ट्रान्समिशन, डिझेल व्हेरिएंटची किंमत 35.09 लाख रुपये आणि 4X2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 37.37 लाख रुपये आहे. त्याच्या डिझेल इंजिनसह 4X4 मॅन्युअल व्हेरियंटची किंमत आता 38.93 लाख रुपये आहे आणि त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत आता 41.22 लाख रुपये झाली आहे.


 


Fortuner Legender कारच्या किंमतीतही वाढ


फॉर्च्युनर लिजेंडर कारच्या किंमतीतही आता नव्याने वाढ करण्यात आली आहे. 4X2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 4X4 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 4X4 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जीआर स्पोर्टच्या किंमतीत 77 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, आता त्यांची नवीन किंमत 42.82 लाख, 46.54 लाख आणि 50.34 लाख रुपये इतकी झाली आहे. टोयोटाने आपल्या सेडान आणि एमपीव्ही सेगमेंट कारची किंमत 90,000 रुपयांवरून 1,85,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यानंतर, केमरी हायब्रिडची किंमत आता 45.25 लाख रुपयांवर गेली आहे आणि वेलफायर हायब्रिडची नवीन किंमत 94,45,000 रुपये आहे.


भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड


टोयोटाच्या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड आहे. त्यापैकी इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरची बरीच विक्री आहे. मात्र आता कंपनीने या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत.


संबंधित बातम्या


Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार


Six Airbags in Car: नितीन गडकरींची मोठी घोषणा! कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षापासून


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI