6 Airbags In Car : कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक (6 Airbags in Car) करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर केले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळाला आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांची सुरक्षिता लक्षात घेता हा निर्णय लागू करण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2022 पासून होणार होती. आता, या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर गेली आहे. आता 1 ऑक्टोबर 2023 पासून कारमध्ये सहा एअरबॅग लावण्यात येणार आहे. 


निर्णय लांबणीवर का?


केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत आपल्या निर्णयाची माहिती दिली. ऑटो इंडस्ट्रीला सध्या मागणी-पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणींमुळे ऑटो इंडस्ट्रीवर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन M1 श्रेणीतील वाहनांमध्ये सहा एअरबॅगच्या अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्यात येणार आहे. 


 







कारच्या किंमतीत वाढ?


कारमध्ये एअरबॅगची संख्या वाढल्यास त्याचा परिणाम कारच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. कारमध्ये सहा एअरबॅग आल्यास  कारची किंमत 30 ते 40 हजारांनी वाढण्याची शक्यता आहे. 


भारताला किती एअरबॅगची गरज?


भारतात कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य केले असते तर सध्या 18 दशलक्षांहून अधिक एअरबॅगची आवश्यकता भासली असती. सध्या देशात 6 दशलक्ष एअरबॅगचे उत्पादन केले जाते. याचाच अर्थ देशात जवळपास 12 दशलक्ष एअरबॅगचा तुटवडा आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Airbag Feature Cars in India : देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; जाणून घ्या कारण


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI