Car Battery Life: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक लोक इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत. इलेक्ट्रिक कार या सामान्य कारच्या तुलनेत महाग आहेत. मात्र ही कार चालवण्याचा  खर्च खप कमी आहे. असं असलं तरी बर्‍याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, त्यांना कारची बॅटरी कधीच बदलण्याची गरज भासणार नाही किंवा इलेक्ट्रिक कारची बॅटरी किती काळ टिकते? तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर चला जाणून घेऊया याचे उत्तर.


किती असते कारच्या बॅटरीची लाईफ? 


विविध कार कंपन्यांकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे तयार केलेल्या अहवालानुसार, सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिक कारची बॅटरी किमान 8 वर्षे किंवा सुमारे 1,50,000 किमी टिकू शकते. ही एक चांगली बाब आहे.  


लिथियम आयन बॅटरीचा होत आहे वापर 


सध्या आधुनिक इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जात आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅब्लेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये या त्याच बॅटरी वापरल्या जातात. प्रत्येक कारमध्ये बॅटरीची क्षमता वेगवेगळी असते आणि यानेच याचा चार्जिंगचा वेळ देखील ठरतो.


दरम्यान, इलेक्ट्रिक कारची बॅटरी दीर्घकाळ टिकेल अशी डिझाइन केलेली असते. परंतु एका अभ्यासाच्या अहवालानुसार, कारच्या लिथियम-आयन बॅटरीची क्षमता दरवर्षी सुमारे 2.3 टक्क्यांनी कमी होते, जे सामान्य आहे. भारत सरकारने ऑटोमोबाईल उत्पादकांना त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीवर आठ वर्षे किंवा 1,50,000 किमी, यापैकी जे आधी असेल ते गॅरंटी देणे बंधनकारक केले आहे. अशा प्रकारे, सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिक कारची बॅटरी 10 वर्षे टिकू शकते आणि 10 वर्षांच्या वापरानंतर, बहुतेक ग्राहक त्यांचे वाहन बदलण्यास प्राधान्य देतात.


देखभाल आवश्यक आहे का?



  • खूप उष्णता किंवा खूप थंडी कारच्या बॅटरीवर वाईट परिणाम करते.

  • कार कधीही पूर्णपणे चार्ज करू नका किंवा पूर्णपणे डिस्चार्ज करू नका. तज्ञांच्या मते, बॅटरीची पातळी 20% ते 80% च्या दरम्यान ठेवणे योग्य मानले जाते.

  • काहीवेळा ते ठीक आहे, परंतु कार नेहमी फास्ट चार्जरने चार्ज करू नये, यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार
Tata Tiago EV vs Tigor EV: टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI