Tiago EV First Look Review: टाटा मोटर्स भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV नुकतीच लॉन्च केली आहे. या बहुप्रतीक्षित कारची गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत होते. अखेर ही कार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. याच कारबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच याचा फर्स्ट लुक रिव्ह्यू पाहूया.
टाटा मोटोर्सची नवीन कार Tiago EV अतिशय आकर्षक आणि अधिक प्रीमियम दिसते. या कारमध्ये खास निळ्या रंगाचे हायलाइट आहे. यात ट्वीक केलेला बंपर आणि वेगळ्या डिझाइन केलेल्या व्हील्स ब्लँक ऑफ ग्रिल मिळते. यात पाच रंगांचे पर्याय आहेत, मात्र याचा निळा रंग खास आहे. या नवीन कारमध्ये इंटीरियरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याच्या स्टॅंडर्ड पेट्रोल Tiago पेक्षा हिरे नवीन कार अधिक प्रीमियम आहे. या ईव्हीमध्ये खास निळा रंग देण्यात आला आहे. यात समान आकाराची टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पुश बटण स्टार्ट, रोटरी गीअर सिलेक्टर, 8-स्पीकर हरमन ऑडिओ सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि हेडलॅम्प अनेक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Tiago EV मध्ये ICE मॉडेल इतकीच स्पेस मिळते. केबिन बऱ्यापैकी प्रीमियम बनवण्यात आली आहे. तसेच स्पेअर व्हील नसल्यामुळे, बूट स्पेस देखील अधिक आहे. यामुळे बॅटरी पॅक ठेवण्यासाठी बरीच जागा उपलब्ध होते. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी पॅक, जो Ziptron आर्किटेक्चरसह दिलेला आहे. या बॅटरी पॅकमध्ये अधिक रेंज आणि जलद चार्जिंग क्षमता देखील आहे. ही बॅटरी DC फास्ट चार्जरने फक्त 57 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज होते. तर सामान्य एसी होम चार्जरने ही कार केवळ 3 तास 36 मिनिटांत चार्ज होऊ शकते.
ही कार 24kWh बॅटरी पॅकसह 315km ची मॉडिफाईड इंडियन ड्रायव्हिंग सायकल (MIDC) रेंज देण्यात सक्षम आहे. तर 19.2kWh बॅटरी पॅकसह 250km ची रेंज मिळवणे शक्य आहे. याचे बहुतेक प्रकार 24kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकसह येतील. तर दोन्ही IP67 रेट केलेले बॅटरी पॅक आहेत. हे दोन ड्राइव्ह मोडसह चार-स्तरीय मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील देते. यात मोठ्या बॅटरी पॅकसह 74hp पॉवर आणि 114 न्यूटन मीटर टॉर्क आउटपुट असल्याचा दावा केला जात आहे. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडते.
किंमत
या कारची किंमत 8.49 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. जी याच्या 19.2kWh बॅटरी व्हेरियंटसाठी आहे. तर याच्या 24kWh व्हेरिएंटची किंमत 9.9 लाख रुपयांपासून सुरू होते. 7.2kW AC होम फास्ट चार्जरसह टॉप-एंड व्हेरियंटची किंमत 11.7 लाख रुपये आहे. या किमती सुरुवातीच्या 10,000 बुकिंगसाठी आहेत. ज्यापैकी 2000 सध्याच्या Tigor/Nexon EV खरेदीदारांसाठी राखीव आहेत.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI