The MINI Charged Edition : बीएमडब्लूने भारतात लाँच केली मिनी इलेक्ट्रिक कार , वाचा सविस्तर
जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमडब्लूने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक मिनी 3-डोर कूपर एसई च्या मोठ्या यशानंतर आता कंपनीने मिनी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.
The MINI Charged Edition launched : जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमडब्लूने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक मिनी 3-डोर कूपर एसई च्या मोठ्या यशानंतर आता कंपनीने मिनी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. लाँच झालेल्या या कारची संख्या मर्यादित असून ही कार shop.mini.in या वेबसाईटवर ग्राहकांना बुक करता येणार आहे. इलेक्ट्रिक मिनी चार्ज्ड एडिशनची एक्स-शोरूम किंमत ही 55 लाख रुपये असणार आहे. मिनी चार्ज्ड एडिशन मिनी स्मार्ट वॉलबॉक्स चार्जर आणि पोर्टेबल डीसी चार्जिंग केबलच्या एकवेळ इंस्टॉलेशनसह येते. या कारची बॅटरी तब्बल 8 वर्ष टिकून राहू शकते. जाणून घेऊयात कारचे दमदार फिचर्स.
मिनी चार्ज्ड एडिशन ही यशस्वी मिनी 3-डोर कूपर SE ची पहिली मर्यादित आवृत्ती आहे. जी भारतात लाँच करण्यात आली आहे. ही कार लाल आणि काळ्या टोन कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारचा लुक हा मिनी 3-डोर कूपर SE प्रमाणेच ठेवण्यात आला आहे. कारला बॉडी पॅनल्ससोबतच एलईडी टेललॅम्प्स देण्यात आले आहेत. तसेच कारला रनिंग लाइट्स , LED हेडलाईट्स, डिझायनर व्हील देण्यात आले आहे. कारच्या बोनेटवर पिवळ्या हायलाइट्ससह एक कॉन्ट्रास्ट फ्रोझन रेड स्पोर्ट्स स्ट्राइप्स देखील असणार आहे. तर 17-इंच मिनी इलेक्ट्रिक पॉवर स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
7.3 सेकंदात 0-100 किमी
बीएमडब्लूची ही मिनी इलेक्ट्रिक कार हवेच्या वेगाने धावते. या गाडीच्या इंजिनमध्ये 184 hp/135 kW आणि 270 Nm चा जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ही इलेक्ट्रिक मिनी कार 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी. वेगाने धावू शकते. यामध्ये 32.6 kWh ती बॅटरी क्षमता आहे.
एकदा चार्ज केल्यानंतर 270 किमी धावणार
बीएमडब्लूची मिनी इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 270 किमीपर्यंत धावते.
फिचर्स काय आहेत?
बीएमडब्लूच्या मिनी इलेक्ट्रिक मॉडलमध्ये वायरलेस चार्जिंग, एन्हांस्ड ब्लूटूथ मोबाइल कनेक्टिव्हिटी, मल्टीफंक्शनल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले, डायनेमिक स्टेबिलिटी कंट्रोल, क्रॅश सेंसर, एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, रन-फ्लॅट टायर आणि रिअर-व्यू कॅमरा यासारखे फिचर्स आहेत.
तर काही दिवसांपूर्वी BMW ने एक बाईक लाँच केली होती. BMW Motorrad India ने भारतीय बाजारपेठेत अपडेटेड G 310 बाईक रेंज सादर केली आहे. यामध्ये 2024 BMW G 310 R, G 310 GS, आणि G 310 RR नवीन कलर शेड्ससह लॉन्च करण्यात आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Tata EV India launch Date : टाटाच्या या 4 इलेक्ट्रिक SUV 2024 पर्यंत होणार लॉन्च; Tata Harrier EV आणि Curve EV कडे विशेष लक्ष