Tesla New Electric Car: टेस्ला बनवत आहे इलेक्ट्रिक हॅचबॅक कार, Volkswagen ID3 ला देणार टक्कर
Tesla Hatchback Car: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅकवर काम करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
Tesla Hatchback Car: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅकवर काम करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ही कार जागतिक बाजारपेठेत फोक्सवॅगनच्या लोकप्रिय मॉडेल आयडी 3 शी (Volkswagen ID3) स्पर्धा करेल. टेस्ला लवकरच याशी संबंधित माहिती प्रसिद्ध करू शकते. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी कंपनीच्या तिसऱ्या जनरेशनच्या ईव्ही प्लॅटफॉर्मची घोषणा केली. टेसल्याच्या या अपकमिंग कारमध्ये काय असू शकतं खास? कंपनी यामध्ये कोणते नवीन फीचर्स देऊ शकते, तसेच याची किंमत किती असू शकते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
Tesla Hatchback Car: कंपनीने टीझर केला रिलीज
टेस्लाने आपल्या इव्हेंटचा एक नवीन टीझर व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये टेस्ला मॉडेल 3 आणि टेस्ला मॉडेल Y चे अनेक डिझाइन स्केचेस दाखवले आहेत. कंपनीच्या सर्वात लहान आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मॉडेलचे साइड प्रोफाइल डिझाइन देखील या व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. कंपनीच्या मॉडेल 3 च्या तुलनेत यात इतर तपशीलांसह तीन दरवाजे आहेत.
Tesla Hatchback Car: किती असेल किंमत?
टेस्लाची ही नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक कंपनीच्या नवीन EV प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे. ज्याला कंपनी आपला थर्ड जनरेशन प्लॅटफॉर्म म्हणते. कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, या नवीन प्लॅटफॉर्मद्वारे कंपनी उत्पादन खर्चात कपात करू शकेल आणि सध्याचे उत्पादन दुप्पट करू शकेल. या नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत सुमारे 25,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 20.65 लाख भारतीय रुपये असण्याची शक्यता आहे. या किंमतीत कार कंपनीच्या सध्याच्या स्वस्त मॉडेलच्या निम्म्या किमतीत येईल.
Tesla Hatchback Car: किती मिळणार रेंज?
अपकमिंगटेस्ला हॅचबॅकमध्ये 50kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो , जो पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 400km ची रेंज देऊ शकेल. हे नवीन मॉडेल चीनमध्ये तयार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. टेस्ला चीनने या संभाव्य कारखान्यासाठी रिक्त जागा घेतली आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट हॅचबॅकचा फोटो देखील पोस्टरमध्ये आहे.
Volkswagen ID3 शी करेल स्पर्धा
ही इलेक्ट्रिक हॅचबॅक कार Volkswagen ID3 शी स्पर्धा करेल. ज्यामध्ये बोनेट एरिया खूपच लहान आहे. याची किंमत सुमारे 23.8 लाख रुपये आहे.
ऑटो संदर्भातील बातमी वाचाच :
Upcoming Hyundai SUV: Hyundai ची micro SUV देणार Tata Punch ला टक्कर, जाणून घ्या कधी होणार लॉन्च