Tata Nexon: भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV च्या सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत कंपनीने वाढ केली आहे. Nexon EV पाच प्रकारांमध्ये XM, XZ Plus, XZ Plus Luxury, XZ Plus Dark आणि टॉप XZ Plus डार्क लक्झरी प्रकारात सादर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक क्रॉसओवर एसयूव्ही जी आधी 14.29 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह उपलब्ध होती. आता याचा बेस मॉडेलसाठी ग्राहकांना 14.54 लाख रुपये किंमत द्यावी लागणार आहे. टाटा मोटर्सने इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे याच्या निवडक मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Nexon EV च्या बेस मॉडेलमध्ये 25,000 हजारांची वाढ केल्यानंतर आता ही कार 14.29 लाख रुपयांऐवजी 14.54 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तसेच Nexon EV XZ व्हेरिएंटची किंमत 15.70 लाख रुपयांवरून 15.95 लाख रुपये झाली आहे. XZ Plus डार्क व्हेरिएंट 16.04 लाख रुपयांवरून 16.29 लाख रुपयांवर गेला आहे आणि EV चा XZ Plus Lux व्हेरिएंट 16.70 वरून 16.95 लाख रुपयांवर गेला आहे. Nexon EV, XZ Plus Dark Lux च्या टॉप व्हेरिएंटने 17 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आता याची किंमत 16.90 लाखांवरून 17.15 लाखांपर्यंत वाढली आहे. (या सर्व किंमती एक्स-शोरूम, दिल्ली आहेत).
Tata Nexon EV ही सध्या पॅसेंजर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये 95 टक्के या टाटाच्या कार आहेत. Tata Nexon EV एका चार्जमध्ये 312 किमीचा पल्ला गाठते, असा दावा कंपनीने केला आहे. डीसी फास्ट चार्जरचा वापर करून ही कार एका तासापेक्षा कमी वेळेत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. असे असले तरी Nexon EV मिळणाऱ्या चार्जचा वापर करून ही कार 10 ते 90 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी 8.5 तास लागतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Electric Scooter: 190km ची रेंज देते 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त...
- Maruti Gift : मारूती कारकडून ग्राहकांसाठी खुशखबर! केवळ 500 रूपयांत दिली 'ही' खास भेट
- RE Scram 411 vs Himalayan: रॉयल एनफिल्डची Scram 411 की हिमालयन? कोणती बाईक तुमच्यासाठी योग्य?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI