Komaki scooter DT 3000 : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Komaki आपली हाय-स्पीड ई-स्कूटर DT 3000 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. 25 मार्च रोजी ही ई-स्कूटर लॉन्च होणार आहे. याची किंमत सुमारे 1,15,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असेल. दरम्यान, कंपनीनं आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा कोणताही फोटो जारी केलेला नाही. कोमाकी डीटी 3000 हे कंपनीचं या वर्षी लॉन्च होणारं तिसरं उत्पादन असेल, याआधी कंपनीने रेंजर आणि व्हेनिस लाँच केलं आहे.


नवीन ई-स्कूटर शक्तिशाली 3000W BLDC मोटरसह येऊ शकते. यात 62V, 52AH ची अॅडवान्स लिथियम बॅटरी असू शकते. रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज केल्यावर 180 ते 220 किमीची रेंज देऊ शकते. त्याचा टॉप स्पीड ताशी 90 किमी असू शकतो. Komaki DT 3000 हे ब्रँडचे त्याच्या नोंदणी मॉडेल श्रेणीतील सहावं उत्पादन असेल.


कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा ​​म्हणाले, "आम्ही DT3000 हाय-स्पीड स्कूटरनं ग्राहकांची मनं जिंकणार आहोत. रिपोर्ट्सनुसार, Komaki DT 3000 इलेक्ट्रिक स्कूटर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली जाऊ शकते. यामध्ये वैशिष्ट्ये देखील भिन्न असू शकतात."


स्पर्धा


Komaki DT 3000 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करणार आहे. यासाठी सर्वात मोठं आव्हान ओला एस1 प्रो, सिंपल वन आणि इव्ह सोल इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर असेल. Ola S1 Pro ची किंमत सुमारे 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. यात 3.97kWh चा बॅटरी पॅक आहे, तो 181 किमीची रेंज देतो. 


दुसरीकडे, सिंपल एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटर 'सिंपल वन' मध्ये 4.8 kWh चा बॅटरी पॅक आहे, ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर इको मोडमध्ये 203 किमीची रेंज देते. त्याची किंमत देखील सुमारे 1.10 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम, वजा सबसिडी). याशिवाय, इव्ह सोल इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 1.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे एका पूर्ण चार्जवर 120 किमी पेक्षा जास्त रेंज देते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI