RE Scram 411 vs Himalayan: अनेकांची आवडती बाईक कंपनी म्हणजे रॉयल इनफिल्ड... पूर्वी बुलेट या मॉडेलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रॉयल इनफिल्ड कंपनीने अलीकडे अनेक हटके बाईक्स लॉन्च केल्या आहेत. यात हिमालयन, इंटरसेप्टर अशा मॉडेल्सचा समावेश असून आता नुकतीच कंपनीने ऑल न्यू Scram 411 ही बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक म्हणजे हिमालयन बाईकचीच लहान बहीण, असं ही आपण म्हणू शकतो. दोन्ही बाईक्सचा लूक काहीसा सेम असल्याने अनेकांना कोणती दोघांतील कोणती बाईक बेस्ट असा प्रश्न पडला आहे.

  


हिमालयन ही बाईक बाजारात तुफान विक्री होत असतानाही स्क्रॅम 411 लॉन्च करण्यामागील कारणही खास आहे. एकीकडे हिमालयन बाईकने काहीशी बजेटमध्ये असणारी अॅडवेन्चर बाईक म्हणून अनेकांना आवडली. पण दैनंदिन वापरासाठी काहीशी अवघड असल्याने हिमालयनचंच छोटं व्हर्जन कंपनीने Scram 411 च्या रुपात समोर आणलं आहे. 


रोजच्या वापरासाठी तरुणांना आवडेल Scram 411 


हिमालयन बाईक ही एक बल्की लूक असणारी अॅडव्हेंचरस बाईक असून ती ऑफ रोडसाठी उत्तम आहे. पण असे असताना स्क्रॅम 411 ही बाईक दैनंदिन वापरासाठी तरुणांना अधिक भावू शकते. या दोन्ही बाईक्सच्या डिझाईनचा विचार करता स्क्रॅमला हिमालयनपेक्षा काही प्रमाणात कमी ऑफ रोड केल आहे. पण हिमालयनपेक्षा ही बाईक अधिक स्पोर्टी आहे. तसंच बाईकचे रंगही व्हाईट फ्लेम, सिल्व्हर स्पिरिट, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, ग्रेफाइट रेड, ग्रेफाइट ब्लू आणि ग्रेफाइट यलो असे असल्याने हे प्रौढांच्या तुलनेत तरुणांना अधिक भावतील.


डिझाईनमुळे स्क्रॅम 411 वापरासाठी अधिक सोपी


हिमालयन बाईकच्या तुलनेत स्क्रॅम 411 ची टायरची साईज कमी केली आहे. स्क्रॅमचा मागील टायर 19 इंच तर पुढील टायर 17 इंच अशा साईजमध्ये आहे. टायरची साईज कमी झाल्याने बाईकचा लूक बदलतोच पण त्यासोबतच बाईक वापरासाठी अधिक सोपी होणार आहे. शिवाय स्क्रॅमची उंची हिमालयनच्या तुलनेत कमी आहे. 


इंजिन आणि किंमत  


नवीन Scrum 411 मध्ये 411cc सिंगल-सिलेंडर, SOHC, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिन देण्यात आले आहे. जे RE हिमालयालामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. हे इंजिन 24.3 hp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर, यात ड्युअल-चॅनल ABS फ्रंट 310 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 mm डिस्क युनिट मिळेल. हिमालयनला दोन्ही बाजूस ABS देण्यात आले आहे. पण स्क्रॅम 411 चं सस्पेन्शन आणि इंजिन तिला अधिक खास बनवतं. किंमतीचा विचार करता हिमालयनची किंमत 2 लाख 14 हजारांपासून सुरु होते तर स्क्रॅम 411 ची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करता स्क्रॅम 411 बजेटमध्ये गाडी पाहणाऱ्यांसाठी चांगला ऑप्शन आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI