(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Electric Car Sale: Tata Motors च्या इलेक्ट्रिक कारची एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री, 1 कोटींच्या Audi etron लाही ग्राहकांची पसंती
April Electric Car Sale Data: पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसत आहे.
April Electric Car Sale Data: पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये एकूण इलेक्ट्रिक पीव्ही विक्री 2150 युनिट्स झाली, जी गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या 597 युनिट्सपेक्षा 260.13 टक्के जास्त आहे. या वर्षी मार्च महिन्यात 3,624 युनिट्सची विक्री झाली असली तरी, या तुलनेत एप्रिलच्या विक्रीत 40.67 टक्के घट झाली आहे.
Tata Motors: अहवालानुसार, टाटा मोटर्सने देशातील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एप्रिलमध्ये भारतात विकल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रिक कारपैकी 83.81 टक्के टाटा मोटर्सच्या मॉडेल्सच्या होत्या. टाटा मोटर्सने 1802 इलेक्ट्रिक कार विकल्या.
MG Motor India: टाटा मोटर्सनंतर एमजी मोटर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमजी मोटर इंडियाने या वर्षी एप्रिलमध्ये 245 इलेक्ट्रिक कार विकल्या, जे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विकल्या गेलेल्या 148 इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत 65.54 टक्के अधिक आहे. मार्च महिन्यात कंपनीने 95 इलेक्ट्रिक कार विकल्या. अशा प्रकारे कंपनीने 157.89 टक्के वाढ केली आहे.
Hyundai India: Hyundai ने यावर्षी एप्रिलमध्ये 23 इलेक्ट्रिक कार विकल्या, जे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विकल्या गेलेल्या 10 EV च्या दुप्पट आहेत. या वर्षी मार्च महिन्यात कंपनीने 18 इलेक्ट्रिक कार विकल्या.
Mahindra : महिंद्राने यावर्षी एप्रिल महिन्यात 13 इलेक्ट्रिक कार विकल्या. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीला केवळ 4 युनिट्सची विक्री करता आली होती. मार्च महिन्यात कंपनीने 18 इलेक्ट्रिक कार विकल्या असल्या तरी कंपनीला मोठा तोटा झाला असल्याचं आकड्यांवरून दिसत आहे.
BMW: BMW ने एप्रिलमध्ये 17 कार विकल्या. कंपनीची iX ची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे. कंपनीने मार्चमध्ये या मॉडेलच्या 9 इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या, म्हणजेच BMW ने एप्रिलमध्येही वाढ केली आहे.
Mercedes Benz India: Mercedes Benz India ने एप्रिलमध्ये 10 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. मर्सिडीजने EQC क्षेत्रात प्रवेश केला आहे. याची किंमत सुमारे 95 लाख रुपये आहे.
Audi India: ऑडी इंडियाने एप्रिलमध्ये त्यांच्या 8 इलेक्ट्रिक कार विकल्या, परंतु ऑडीच्या विक्रीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीकडे एट्रॉन आणि एट्रॉन जीटी मॉडेल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत 1 कोटी रुपयांपासून सुरू होते.