एक्स्प्लोर

Tata Motors Mini Truck: मजबूत आणि जबरदस्त! टाटाने लॉन्च केले 3 मिनी ट्र्क

Tata Motors Mini Truck: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स सध्या देशभरात प्रत्येक सेगमेंटमध्ये आपली नवीन वाहन सादर करत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

Tata Motors Mini Truck: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स सध्या देशभरात प्रत्येक सेगमेंटमध्ये आपली नवीन वाहन सादर करत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. आता कंपनीने व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्येही बाजारात आपली नवीन उत्पादने उतरवली आहे. टाटा मोटर्सने आज योधा 2.0, इंट्रा V20 CNG आणि इंट्रा V50 ही 3 व्यावसायिक वाहने लॉन्च केली आहेत. यापैकी टाटा योधा 2.0 हा हार्ड कोअर पिकअप ट्रक आहे. तर इतर दोन मॉडेल हलकी व्यावसायिक वाहने आहेत. हे पिकअप ट्रक नवीन डिझाइन, लांब डेक, आधुनिक फीचर्स आणि सर्वाधिक भार वाहून नेण्याच्या क्षमतेसह येतात.

या नवीन मॉडेल्समध्ये टाटा योधा 2.0 हा सर्वातआरामदायी पिकअप ट्रक आहे. हे ट्र्क व्हर्जन 2.0 (टू पॉइंट O) म्हणून येत आहे.  या नवीन मॉडेलमध्ये मागील पिढीच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन डिझाइन आहे. ही नवीन मॉडेल्स 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. कोरोना संकटामुळे ही वाहन बाजारात दाखल होण्यास उशिरा झाला. टाटा योधा 2.0 पिकअप ट्रकमध्ये मागील मॉडेलपेक्षा नवीन क्रोम ग्रिल, योधा सिरीजमध्ये पहिल्यांदा नव्याने डिझाइन केलेले हेडलाइट आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्पसाठी नवीन स्क्वेरिश हाऊसिंग आणि बंपरखाली मोठा एअर डॅम देण्यात आला आहे.

नवीन टाटा योधा 2.0 हे शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांच्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन अपग्रेड करण्यात आले आहे. नवीन Tata Yodha 2.0, Intra V20 CNG आणि Intra V50 हे कृषी, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्र तसेच FMCG, ई-कॉमर्स यासारख्या क्षेत्रांच्या वितरण आवश्यकतांसाठी डिझाइन केलेले आहेत.  कंपनीचा दावा आहे की टाटाच्या स्वाक्षरीसह 'ट्रस्ट बार' असलेली योधा 2.0 खडबडीत रस्त्यांवरही सुरळीतपणे धावू शकते.

मॉडेल 4×4 (ऑल-व्हील ड्राइव्ह) आणि 4×2 (टू-व्हील ड्राइव्ह) कॉन्फिगरेशनमध्ये 1,200, 1,500 आणि 1,700 किलो पेलोड पर्यायांसह उपलब्ध आहे. हे ग्राहकाच्या पसंतीनुसार सिंगल कॅब आणि क्रू कॅबच्या अतिरिक्त आसन क्षमतेसह देखील उपलब्ध आहे. यात 30 टक्के ग्रेड कार्यक्षमतेसह 2 टन लोडिंग क्षमता आहे. Tata Yodha 2.0 पिकअप ट्रकमध्ये पॉवरफुल 2.2L डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 250 Nm टॉर्क जनरेट करते. इंट्रा V50 स्मार्ट पिकअपमध्ये 1500kg लोड क्षमता असलेली सर्वात मोठी डेक लांबी आहे. यात 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 220 Nm टॉर्क जनरेट करते.

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Embed widget