(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto News : Skoda Octavia Facelift 14 फेब्रुवारीला होणार लॉन्च; डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स एकदा पाहाच
2024 Skoda Octavia : 2024 Skoda Octavia नवीन डिझाईन केलेले बंपर आणि नवीन फ्रंट ग्रिलसह, एक शार्प लूकसह उपलब्ध करण्यात आली आहे.
2024 Skoda Octavia : दिग्गज कार निर्माता कंपनी स्कोडा (Skoda) ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेटेड व्हर्जन घेऊन येत असते. नुकतीच Skoda Auto ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, 14 फेब्रुवारी 2024 रोजी Octavia फेसलिफ्ट जागतिक बाजारात सादर करणार आहे. कंपनीने 2024 Skoda Octavia ची स्मूथ स्टाईल सादर करणारे अनेक स्केचेस जारी केले आहेत. नवीन ऑक्टाव्हिया स्पोर्टलाईन आणि व्हीआरएस व्हेरिएंटसह ऑफर केली जाईल असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
डिझाईन अपडेट काय असणार?
2024 Skoda Octavia नवीन डिझाईन केलेले बंपर आणि नवीन फ्रंट ग्रिलसह, एक शार्प लूकसह उपलब्ध करण्यात आली आहे. सेडान नवीन शैलीतील एलईडी मॅट्रिक्स बीम हेडलाईट्ससह नवीन प्रकाश सिग्नेचरसह सुसज्ज आहे. कंपनीचे म्हणणे आहे की "यात आता क्रिस्टलिनियम, एक अद्वितीय क्रिस्टलीय घटक समाविष्ट आहे जो हेडलाईट हाउसिंगच्या आतील भागात एक विशिष्ट निळा कलर देण्यात आला आहे. त्यामुळे ही कार अधिक आकर्षक वाटते."
2024 स्कोडा ऑक्टाव्हिया वैशिष्ट्ये काय असतील?
Skoda ने या सेडानचे इंजिनच्या संदर्भातील अधिक तपशील अद्याप उघड केलेले नाहीत. पण, नवीन Octavia मध्ये 1.5-liter टर्बोचार्ज्ड पेट्रोल, 2.0 लीटर टर्बो डिझेल आणि लाईट हायब्रिड पॉवरट्रेन मिळतील अशी अपेक्षा आहे. Kodiaq आणि Superb प्रमाणे, नवीन Octavia ला प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन देखील मिळू शकते. प्लग-इन हायब्रिड किंवा PHEV ला इलेक्ट्रिक मोटरसह 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 204bhp पॉवर आउटपुट जनरेट करते असे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
प्लग इन हायब्रिड व्हेरिएंट भारतात येण्याची शक्यता
स्कोडा ऑक्टाव्हियाचे इलेक्ट्रिक डेरिव्हेटिव्ह देखील तयार करत आहे, जे ICE मॉडेल नंतर बाजारात येण्याची अपेक्षा आहे. याला फॉक्सवॅगन ग्रुपचा 89kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे, ज्याची WLTP रेंज 595 किमी पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातो. स्कोडा भारतीय बाजारपेठेत प्लग-इन हायब्रिड टेक्नॉलॉजीसह ऑक्टाव्हिया आरएस IV देखील सादर करेल अशी अपेक्षा आहे. याबरोबरच नवीन सुपर्ब देखील देशात लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय कंपनी या वर्षी देशात Enyaq iV इलेक्ट्रिक SUV देखील सादर करणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :