Kinetic E-Luna launched : इलेक्ट्रिक लुना मोपेड भारतीय बाजारात लॉन्च; एका चार्जवर 110 किलोमीटर धावणार, 'ही' असतील खास वैशिष्ट्य
Kinetic E-Luna launched In India : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लुना मोपेड मॉडेल बाईकचं अनावरण केलं.
Kinetic E-Luna launched In India : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी कायनेटिक (Kinetic) ग्रीनने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर इलेक्ट्रिक अवतारात (Electric Vehicle) आपले लुना मोपेड मॉडेलला लॉन्च केले आहे. कंपनीने त्याची एक्स-शोरूम किंमत 70,000 रुपये इतकी ठेवली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते या बाईकचं अनावरण करण्यात आलं आहे. तर, आता या बाईकची खास वैशिष्ट्ये नेमकी कोणती असणार आहेत तसेच ही बाईक कोणत्या कलरमध्ये उपलब्ध असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
लवकरच विक्री सुरु होणार
जर तुम्हालाही ही बाईक विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन फक्त 500 रुपयांच्या टोकन रकमेसह ही बाईक बुक करू शकता. बाईकच्या डिलिव्हरीबद्दल बोलायचे झाले तर, बाईकची डिलीव्हरी लवकरच देशभरातील सर्व कायनेटिक ग्रीन डीलरशिपमधून सुरू होईल. याशिवाय, हे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल. कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांच्या मते, आतापर्यंत 40,000 हून अधिक ग्राहकांनी त्यांची स्वारस्य दर्शविली आहे.
बॅटरी पॅक आणि टॉप-स्पीड काय असेल?
ई-लुना ड्युअल-ट्यूब्युलर स्टील चेसिसवर आधारित आहे आणि तिची पेलोड क्षमता 150 किलो आहे. हे 2.0 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. या बाईकच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक एका चार्जवर 110 किमीचा दावा केला जातो. यात स्वॅप करण्यायोग्य बॅटरी आणि जलद चार्जिंगचा पर्याय देखील आहे. ई-लुनाचा टॉप स्पीड 50 किमी/तास आहे. कंपनी नंतर 1.7 kWh आणि मोठ्या 3.0 kWh बॅटरी पॅक व्हेरियंट सादर करण्याचा विचार करत आहे.
या बाईकची वैशिष्ट्ये काय आहेत?
बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात रिअल-टाईम डीटीई किंवा "डिस्टन्स टू एम्प्टी" रेंज इंडिकेटर प्लस कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, 16 इंच चाके, यूएसबी, चार्जिंग पोर्ट, तीन रायडिंग मोड, एक वेगळे करण्यायोग्य मागील सीट आणि साईड स्टँड सेन्सर आहे.
कलर ऑप्शन
या बाईकच्या कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ही बाईक 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मलबेरी रेड, ओशन ब्लू, पर्ल यलो, स्पार्कलिंग ग्रीन आणि नाईट स्टार ब्लॅक यांचा समावेश करण्यात आला आहे. ई-लूना चार तासांत भरता येते. त्याचे वजन 96 किलो इतके आहे. इलेक्ट्रिक लुनाचा वापर वैयक्तिक वापरासाठी तसेच व्यावसायिक वाहनासाठी केला जाऊ शकतो.