Vande Bharat Trains: लवकरच रुळांवर धावणार सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस; रेल्वेने बनवली मोठी योजना
Vande Bharat Trains: लवकरच देशातील रेल्वे रुळांवर नवीन डिझाइन आणि आधुनिक सुविधांसह वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावताना दिसणार आहे.
Vande Bharat Trains: लवकरच देशातील रेल्वे रुळांवर नवीन डिझाइन आणि आधुनिक सुविधांसह वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावताना दिसणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची 115 कोटी रुपये खर्चून निर्मिती केली जाईल. या 16 डब्यांच्या सेमी-हाय स्पीड ( Semi High Speed Train) गाड्यांपैकी ऑगस्टमध्ये दोन ट्रेनची चाचणी घेतली जाईल, ज्यासाठी या गाड्या रुळांवर उतरवल्या जातील.
सध्या दोन वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत
सध्या 115 कोटी रुपये खर्चून वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तयार केली जात आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर डबे तयार केल्यानंतर किमतीत लक्षणीय घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे. सध्या भारतीय रेल्वे दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवत आहे. एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली ते कटरा आणि दुसरी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावत आहे. नवीन अपग्रेड केलेली 75 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांच्या बाबतीत आणखी चांगली होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे.
नवी वंदे भारत ट्रेन अत्यंत सुरक्षित असेल
नवीन वंदे भारत गाड्यांमध्ये सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यात धोक्याच्या वेळी सिग्नल क्रॉसिंग (SPAD) प्रकरणे टाळण्यासाठी ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टम (TCAS) वापरण्यात येईल. सुरक्षा उपायांमध्ये प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन खिडक्या असतील. तर नवीन गाड्यांमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये स्वयंचलित दरवाजे, डब्यांसाठी सेन्सर-संचालित दरवाजे, रुंद खिडक्या आणि अधिक स्टोरेज स्पेस असेल.
वंदे भारत गाड्यांचे उत्पादन वाढेल
चेन्नई ICF दर महिन्याला सुमारे 10 ट्रेन तयार करण्याची योजना आखत आहे. एफ-कपूरथला आणि रायबरेली येथील आधुनिक कोच फॅक्टरी पुढील तीन वर्षांत 400 वंदे भारत गाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे डबे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत.