Renault Car Discounts : प्रसिद्ध फ्रेंच ऑटो मेकर कंपनी रेनॉल्ट इंडिया (Renault Car) जून महिन्यात त्यांच्या अनेक नव्या कार्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या कार्समध्ये ‘क्विड हॅचबॅक’, ‘किगर कॉम्पॅक्ट एसयूव्ही’ आणि ‘ट्रायबर एमपीव्ही’ या गाड्यांचा समावेश आहे. तुम्ही देखील या काळात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरेल. यापैकी कोणतीही रेनॉल्ट कार खरेदी केल्यास, तब्बल एक लाख रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकते. या कार्स तुम्ही ऑनलाईन देखील बुक करू शकता. नवी कार खरेदी करायचा विचार करत असाल तर, जाणून घ्या या बंपर डिस्काउंट्सबद्दल..


रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)


बंपर डिस्काउंट्स मिळणाऱ्या या यादीतील पहिली कार Renault Kwid आहे. रेनॉल्ट कंपनी या एंट्री-लेव्हल क्विड हॅचबॅक कारवर 35,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या कारवर 37,000 रुपयांपर्यंतचा विशेष लॉयल्टी बोनस आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळवू शकता. एकूणच, कंपनी तुम्हाला Kwid गाडीवर एकूण 82,000चा बंपर डिस्काउंट देत आहे. या कारची किंमत 4.62 लाख रुपयांपासून सुरू होते.


रेनॉल्ट किगर (Renault Kiger)


या यादीतील दुसरी कार आहे रेनॉल्ट किगर. Renault Kiger ही कार भारतात खूप लोकप्रिय आहे. रेनॉल्ट किगर ही या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनी या कारवर तब्बल 55,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. शिवाय, ही गाडी खरेदी करणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी देखील एकविशेष ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा लाभ देखील घेता येऊ शकतो. एकूणच या कारवर 75,000 रुपयांची सूट मिळत आहे. या गाडीची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते.


रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)


बंपर डिस्काउंट्स मिळणाऱ्या या यादीतील तिसरी कार रेनॉल्ट ट्रायबर आहे. रेनॉल्ट ट्रायबर ही 7-सीटर एमपीव्ही कार आहे. या गाडीवर कंपनी स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे, 44,000 रुपयांपर्यंतचा विशेष लॉयल्टी बोनस आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. या गाडीवर एकूण 94,000 रुपयांची सूट मिळत आहे. रेनॉल्ट ट्रायबर या गाडीची सुरुवात 5.88 लाख रुपयांपासून होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI