Upcoming Electric Bike: हॉप इलेक्ट्रिक कंपनी आपली इलेक्ट्रिक बाइक Oxo 100 लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या वर्षी जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही बाईक लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची चाचणी जयपूर, जोधपूर, पाटणा आणि कोलकाता सह 20 शहरांमध्ये करण्यात आली आहे. या आगामी बाईकने 75,000 किमी रस्त्याची चाचणी पूर्ण केली आहे. त्यानंतर ARAI प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. या आगामी बाईकची बुकिंग विंडो उघडी आहे. तुम्हालाही ही बाईक बुक करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 999 रुपये भरून प्री-बुक करू शकता.


जबरदस्त लूक 


Oxo 100 च्या लूक आणि डिझाइनबद्दल सांगायचे तर, ही स्पोर्टी डिझाइन आणि आकर्षक बॉडी स्टाइलसह येईल. जी यामाहा FZ V2.0 सारखे दिसेल. सामान्य बाईकमध्ये जिथे IC इंजिन असते, तुम्हाला या आगामी बाईकमध्ये बॅटरी पाहायला मिळेल. यासोबतच 'फ्युएल टँक'च्या बाजूला स्लीक इंटिग्रेटेड एलईडी लाइटिंग स्ट्रिप देण्यात आली आहे.


दमदार रेंज 


Oxo 100 मध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि हब मोटर दिली जाऊ शकते. असं असलं तरी कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती उघड केलेली नाही. त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे की, या आगामी ई-बाईकची रेंज 100 ते 150 किमी असेल. तसेच याची टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असेल.


किंमत 


या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये HOP LEO आणि LYF इलेक्ट्रिक स्कूटर देखील आहेत. कंपनी पुढील 3 वर्षांत भारतीय बाजारपेठेत किमान 10 नवीन इलेक्ट्रिक आणण्याच्या धोरणावर काम करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hyundai Venue Facelift 2022 : फेसलिफ्टच्या 15,000 युनिट्स बुक, या कारमध्ये काय आहे खास?
Double Decker Electric Bus: खुशखबर! मुंबईत लवकरच धावणार 'डबल डेकर इलेक्ट्रिक बस'


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI