Hyundai Stargazer: तुम्ही जर 7 सीटर कार, कमी किंमत आणि आकर्षक लूकसह शोधत असाल, तर Hyundai Motors ची आगामी MPV - Hyundai Stargazer ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून या कारची टेस्टिंग करत आहे. कंपनी या कारची अधीकृत माहिती ऑगस्ट 2022 पर्यंत जाहीर करू शकते. ही कार कंपनी सर्वात आधी इंडोनेशियामध्ये लॉन्च करू शकते. यानंतर ही कार भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येईल. Hyundai Stargazer लॉन्च झाल्यानंतर भारतात याची स्पर्धा Mahindra XUV, आगामी Toyota Avanza, Kia Cars आणि Maruti Suzuki Ertiga शी होईल.
भारतात सध्या ग्राहकांना Hyundai Motors ची Alcazar कार 6 सीटर पर्यायासह पाहायला मिळते. Hyundai Stargazer च्या लूक्सबद्दल बोलायचे झाले तर, ही Kia Carnes प्रमाणेच SP2 प्लॅटफॉर्मवर विकसित केल्याचे सांगितले जात आहे. या नवीन MPV Stargazer मध्ये तुम्हाला स्प्लिट हेडलॅम्प, LED DRLs, स्लोपिंग रूफलाइन आणि शार्क फिन अँटेनासह नवीन ग्रिल सारखी आकर्षक बाह्य डिझाइन मिळेल. या MPV ची लांबी 4.5 मीटर असेल आणि हिचा व्हीलबेस 2.7 मीटर असेल. एमपीव्ही सेगमेंटमधील इतर कारच्या तुलनेत ही कार अतिशय किफायतशीर आणि उत्कृष्ट फीचर्ससह येईल.
इंजिन आणि फीचर्स
Hyundai च्या आगामी MPV Stargazer मध्ये ग्राहकांना 1.5 लीटर 4-सिलेंडर नॅचरल एस्पिरेटर पेट्रोल इंजिन मिळेल. जे 113 bhp पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच Stargazer मध्ये 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन देखील मिळू शकते. ज्यामध्ये 113 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता असेल. ही कार 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायामध्ये देखील दिसू शकते. Stargazer च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, या कारमध्ये तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम जसे की Android Auto आणि MPV मध्ये Apple कार प्ले सपोर्ट, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम, मल्टिपल एअर बॅग्ज आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी तसेच सेफ्टी फीचर्स यासारखे सर्व नवीनतम फीचर्स मिळतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
प्रतीक्षा संपली! Hyundai Venue Facelift भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह मिळणार हे फीचर्स
Car : Hyundai Venue, Kia Sonet की Tata Nexon कोणती कार सर्वात भारी? वाचा A to Z माहिती
Car loan Information:
Calculate Car Loan EMI