Upcoming Maruti Suzuki Cars In India: भारताची स्वदेशी कंपनी मारुती सुझुकी या वर्षी आपली तीन नवीन कार लाँच करणार आहे. त्यापैकी एक या महिन्यात लॉन्च होणार आहे. तसेच मारुती सुझुकी ब्रेझा SUV च्या माध्यमातून SUV सेगमेंटमध्ये आपली विक्री आणखी वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. चला तर जाणून घेऊ मारुती सुझुकी या वर्षी कोणत्या कार भारतात लॉन्च करणार आहे.
Maruti Brezza 2022
मारुती ब्रेझा या वर्षातील लॉन्चच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने याचे अनेक बाहेरील आणि अंतर्गत फीचर्स अपडेट केले आहेत. ही कार आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणार आहे. कंपनीने या कारचे Vitara हे नाव काढून टाकले असून आता ही कार फक्त Brezza नावाने 30 जून रोजी लॉन्च केली जाईल.
Maruti Suzuki Mid Size SUV
मारुती सुझुकी इंडो-जपानी ऑटोमेकर टोयोटाच्या सहकार्याने नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर काम करत आहे. 2022 च्या फेस्टिव्ह सीझनमध्ये हे मॉडेल लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नवीन मारुती SUV तिचे प्लॅटफॉर्म (टोयोटाचे TNGA-B), डिझाइन, फीचर्स आणि इंजिन आगामी टोयोटा मध्यम आकाराच्या SUV सोबत शेअर करेल.
Maruti Suzuki Alto 2022
मारुती सुझुकी ऑगस्टपर्यंत नवीन अपडेट्ससह Alto 2022 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी मारुती सुझुकी अल्टो 2022 सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा जास्त उंच असेल. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि कीलेस एंट्री यासारख्या फीचर्स मिळतील.
महत्वाच्या बातम्या :
- Mahindra Neo Plus लवकरच दिसणार नव्या लूकमध्ये; 'हे' मिळतील दमदार फीचर्स
- Volvo XC40 : Volvo आपली पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 जुलैमध्ये करणार लॉन्च! जाणून घ्या फिचर्स
- Hyundai i20, Alcazar आणि Creta ग्राहकांना आता फक्त एकच चावी मिळणार, काय आहे नेमकं कारण?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI