(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ola Motorcycles 2024 : ओला भारतात आपली इलेक्ट्रिक मोटरसायकल कधी लॉन्च करणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी आता Electric Bike लवकरच लाँच करणार आहे. येत्या काळात भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त बाईक दाखल होणार आहेत.
Ola Motorcycles 2024 : Ola ने लाँच केलेली Electric Scooter ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पसंत पडली होती. अनेकांनी ही स्कूटर खरेदी केली आणि त्याबद्दल चांगले रिव्हूज दिले. त्यामुळे कंपनी आता Electric Bike लवकरच लाँच करणार आहे. येत्या काळात भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त बाईक दाखल होणार आहेत.
कंपनीने 15 आॅगस्ट रोजी Electric Bike विषयी खुलासा केला आहे. या नवीन Electri Bike लवकरतच भारतात आणली जाणार आहे. 2024 वर्षाच्या शेवटी या चार बाईक बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये ओला क्रुझर, ओला अॅडव्हेंचर, ओला रोडस्टर आणि ओला डायमंड हेड बाईक्सचा समावेश असणार आहे. Ola कंपनीने दावा केला आहे की, या भारतातील सर्वात वेगवान Elecric Bike असणार आहेत. जिचा वेग 120 किमी प्रतितास असेल. मात्र या गाड्यांच्या फिचर्सविषयी आणखीन माहिती देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच Ola ने दोन नवीन Electric Scooter लाँच केल्या होत्या. Ola S1X 150 किमीच्या रेंजसह दोन व्हेरिएंटमध्ये येतो. Ola S1X ची सुरुवातीची किंमत सुमारे 79,999 रुपये आहे. कंपनीने 15 ऑगस्टपासून नवीन स्कूटरचे बुकिंग सुरू केले असून, तसेच 21 ऑगस्टपर्यंत बुकिंगवर अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. Ola S1X इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी देखील या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
15 ऑगस्ट 2023 रोजी ओला इलेक्ट्रिकने काय लाँच केले?
Ola S1X इलेक्ट्रिक स्कूटर- ही स्कूटर पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त आहे.
ओला इलेक्ट्रिक बाइक- ओला इलेक्ट्रिकने क्रूझर, अॅडव्हेंचर आणि रोडस्टर प्रकारांमध्ये ई-बाईकचे अनावरण केले आहे.
ओला इलेक्ट्रिकने डायमंड हेड नावाच्या सुपरबाईकचेही अनावरण केले आहे. याबाबत अजून फारसा खुलासा झालेला नाही.
MoveOS 4 सॉफ्टवेअर- ओला इलेक्ट्रिकचे हे नवीन सॉफ्टवेअर वाहनातील तंत्रज्ञान आणि फिचर्ससह स्कूटरची रेंजही वाढेल.
इतर महत्वाच्या बातम्या