एक्स्प्लोर

Tata Nexon : Tata Nexon CNG लवकरच लाँच होणार, मिळणार भारी फिचर्स अन् मोठी बूटस्पेस!

टाटा मोटर्स नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच दिल्लीत झालेल्या 2024 इंडिया मोबिलिटी शोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती.

Tata Nexon :  टाटा मोटर्स आपल्या सध्याच्या (Auto News) मॉडेल्समध्ये (Tata Nexon)सातत्याने सीएनजीचा पर्याय जोडत आहे. टियागो आणि टिगोर सीएनजी मॉडेल सादर (TATA Motors) केल्यानंतर आता टाटा मोटर्स नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच दिल्लीत झालेल्या 2024 इंडिया मोबिलिटी शोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती.

या वर्षी लाँच होणार?

नेक्सॉन सीएनजी व्हर्जन ही या सेगमेंटमधील पहिली टर्बो-पेट्रोल सीएनजी कार असेल आणि ती मारुती ब्रेझा सीएनजीला टक्कर रदेईल. लाँचिंगची नेमकी तारीख किंवा त्यासंदर्भातली माहिती अजून समोप आलेली नसली तरी दिवाळीपूर्वी सणासुदीच्या काळात हे नवे मॉडेल लाँच केले जाण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सनेही यावर्षी नेक्सॉन सीएनजी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 

ट्विन  सीएनजी सिलिंडर टेक्नॉलॉजी मिळणार

नेक्सॉन सीएनजी मध्ये टाटाच्या नाविन्यपूर्ण ट्विन सीएनजी सिलिंडर टेक्नॉलॉजीसह 1.2 लीटर, 3-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. मात्र, टाटाने आपले मायलेज आणि पॉवरचे आकडे जाहीर केलेले नाहीत. हा ट्विन सिलिंडर सेटअप टियागो आणि टिगोर सीएनजीमध्येही देण्यात आले आहे. यामध्ये बूट फ्लोअरच्या खाली दोन सीएनजी सिलिंडरच्या टॅंक ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे बूट स्पेसचे फारसे नुकसान होत नाही. तसेच कारच्या तळाशी स्पेअर व्हील ठेवण्यात आले आहे. 

सीएनजीवर सुरू होणार

सीएनजी नेक्सनची स्टायलिंग नियमित पेट्रोल आणि डिझेल नेक्सनसारखीच आहे. सीएनजी ते पेट्रोल मोडदरम्यान फास्ट शिफ्टसाठी एसयूव्ही सिंगल ईसीयूसह येते. टाटा नेक्सॉन थेट सीएनजी मोडमध्ये देखील सुरू होऊ शकते, यात इंधन फंक्शन्सदरम्यान ऑटो स्विच आहे.

कर्व्ह लवकरच लाँच होणार 


केवळ नेक्सॉन सीएनजीच नाही तर टाटा मोटर्सनेही कर्व्ह एसयूव्ही कूपे देखील यावर्षी भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. आधी त्याचे इलेक्ट्रिक व्हेरियंट येईल, त्यानंतर आयसीई मॉडेल येईल. भारत मोबिलिटी शोमध्ये टाटाने कर्व्ह एसयूव्ही डिझेल पॉवरट्रेनसोबत येणार असल्याची माहिती दिली आहे. यात 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. जे नेक्सनमध्येही पाहायला मिळते.

इतर महत्वाची बातमी-

 

 

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Embed widget