Mercedes-Benz भारतात डिसेंबर महिन्यात लॉन्च करणार दोन नवीन एसयूव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Mercedes-Benz : जर्मनीची वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंन्झ आपल्या लक्झरी वाहनांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात मर्सिडीजच्या वाहनांना मोठी पसंती मिळत आहे. देशात मर्सिडीज कारचा एक मोठा चाहता वर्ग आहे.
Mercedes-Benz : जर्मनीची वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंन्झ आपल्या लक्झरी वाहनांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात मर्सिडीजच्या वाहनांना मोठी पसंती मिळत आहे. देशात मर्सिडीज कारचा एक मोठा चाहता वर्ग आहे. अशातच कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपल्या दोन नवीन एसयूव्ही लॉन्च करणार आहे. कंपनी 2 डिसेंबर रोजी देशात Mercedes-Benz GLB आणि इलेक्ट्रिक SUV EQB लॉन्च करणार आहेत. कंपनीच्या कार लाईनपमध्ये जीबीएल ही एक सेव्हन सीटर कार आहे. तर EQB ही लक्झरी ईव्ही सेगमेंटमधील पहिली सेव्हन-सीटर एसयूव्ही असेल. EQB ही EQC नंतर कंपनीच्या इलेक्ट्रिक लाइन-अपमधील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार असण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या दोन्ही एसयूव्हीची बुकिंग सुरु केली आहे. Mercedes-Benz GLB आणि SUV EQB या दोन्हींची बुकिंग किंमत 1.5 लाख रुपये आहे. इच्छुक ग्राहक या दोन्ही कार ऑनलाइन बुक करू शकतात.
मर्सिडीज-बेंझ इक्यूबीचे हे भारतात तिसरे व्हर्जन आहे. याआधी कंपनीने EQB AMG EQS 53 4MATIC+ आणि EQS 580 4MATIC लॉन्च केली आहे. जागतिक स्तरावर EQB इलेक्ट्रिक SUV चे अनेक प्रकार आहेत. यामध्ये EQB 250 सर्वात चांगला पर्याय असून. याची मोटर 188 bhp आणि 385 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच EQB 300 4MATIC 225 Bhp पॉवर आणि 390 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारच्या टॉप-व्हेरिएंट EQB 350 4मॅटिक कार 288 bhp आणि 520 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बॅटरी पर्यायांमध्ये 330 किमी रेंजसह 66.5 kW युनिट समाविष्ट आहे. जे एकदा चार्ज केल्यावर 391 किमीची रेंज देते.
Mercedes-Benz GLB बोलायचे झाले तर ही लक्झरी SUV तरुणांसाठी उत्तम आहे. हे मॉडेल बेबी जीएलएससारखे दिसण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. तसेच ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील दुसरी सेव्हन-सीटर एसयूव्ही देखील असेल. याची किमती अधिक असू शकते. GLC च्या 2,873 mm व्हीलबेसच्या तुलनेत GLB 2,829 mm वर थोडासा कमी पडतो. याच्या कॅबिनमध्ये ड्युअल स्क्रीन, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, लेदर स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. मर्सिडीज-बेंझ GLB मध्ये अधिक पॉवर मिळण्याची शक्यता आहे, 220d प्रकारात 188 bhp आणि 400 Nm पीक टॉर्कसह 2.0-लिटर डिझेलशी जोडलेल्या 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले आहे. GLB 200 पेट्रोलमध्ये 161 bhp आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करणारी 2.0-लीटर मोटर देखील मिळेल. तसेच ही मोटर 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडली जाईल.